लुक आणि फिगरच नाही तर फॅशनमध्येही देतेय मलायकाला टक्कर, हिना पांचाळचा ग्लॅमरस अंदाज

हिना पांचाळ हा चेहरा रियालिटी शो साठी नवा नाही. अनेक हिंदी मराठी रियालिटी शो मध्ये हिना दिसली आहे. बिग बॉस मराठीच्या २ ऱ्या पर्वातही हिना पांचाळ गाजली होती. मात्र अजूनही हिनाला स्वतःची ओळख मिळाली नाहीये. अभिनेत्री मलायका अरोराची कॉपी असाच ठप्पा तिच्यावर बसला आहे. पण खऱ्या आयुष्यात मलायकाला फॅशनच्या बाबतीत हिना कमालीची टक्कर देतेय. फिटनेसमध्येही हिना पुढे आहे. पाहूया हिनाच्या अदा. (फोटो सौजन्य – @theofficialheena Instagram)

​लाल इश्क मलाल इश्क​

​लाल इश्क मलाल इश्क​

Lal Ishq Malal Ishq: हिनाने नुकतेच फोटोशूट केले असून तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हिनाचा हा लाल साडीतील लुक अत्यंत ग्लॅमरस असून तिच्या आकर्षक फिगरकडेही त्यामुळे लक्ष जात आहे. परफेक्ट फिटनेसमुळे हिनाचा लुक अधिक सुंदर दिसत आहे. शिफॉन लाल साडीमध्ये हिनाला पाहून यश चोप्राच्या चित्रपटांचीच आठवण येते आहे.

​ग्लॅम डॉल हिना​

​ग्लॅम डॉल हिना​

Glam Doll Heena: हिनाने घातलेला डीप प्लंजिंग गोल्डन गाऊन अत्यंत आकर्षक असून तिच्यावरून नजरच हटू देत नाहीये. यामध्ये कोचावर बसून हिनाने दिलेली पोझ कोणत्याही हिरॉईनपेक्षा कमी नाही. तर तिच्याकडे पाहून पुन्हा एकदा मलायकाचीच आठवण येत आहे. मात्र फॅशनच्या बाबतीत हिना ऑनपॉईंट आहे.

हेही वाचा :  ब्लॅक शिमरी गाऊनमधील मलायकाचा ग्लॅम लुक, म्हणाली ‘आई बघ तुला माझा अभिमान वाटेल’

(वाचा -‘ही गुलाबी हवा’ प्राजक्ताकडे पाहून कलेजा खलास झाला, सौंदर्यवतीच्या अदांनी चाहते घायाळ)

​डीप नेक ब्लाऊज आणि मिनिमल दागिने​

​डीप नेक ब्लाऊज आणि मिनिमल दागिने​

Deep Neck Blouse And Minimal Jewelry: या लाल शिफॉन साडीसह डीप नेक गोल्डन अँड रेड डिझाईनर ब्लाऊज हिनाने निवडला आहे. तर अगदी मिनिमल दागिन्यांनी लुक पूर्ण केला आहे. हेव्ही कानातले आणि ब्रेसलेटची स्टाईल केली आहे. तर केसांचा मधून भांग पाडून केस मोकळे सोडले आहेत. हिना साडीतील या पोझमध्ये अत्यंत आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.

(वाचा – मराठमोळ्या तेजस्वीचे साडीतील तेजस्वी रूप, डोळ्यांचे पारणे फिटेल असा लुक)

​मोत्याचे कानातले आणि अंगठी​

​मोत्याचे कानातले आणि अंगठी​

Pearl Earrings And Ring: गाऊनला साजेसे असे साधे पण एलिगंट मोत्याचे कानातले हिनाने घातले असून केवळ अंगठी घातली आहे. त्यामुळे परिधान केलेल्या यल्लो गाऊनकडे अधिक लक्ष वेधले जात आहे. तर हिनाच्या कातिल अदांनी चाहत्यांचा कलिजाच खल्लास झाला आहे.

(वाचा – घटस्फोटाच्या चर्चेनंतर साडीच्या अनारकलीत मानसी नाईकचा खास अंदाज, हातभर चुड्याने वेधले लक्ष)

​न्यूड मेकअप​

​न्यूड मेकअप​

Nude Makeup: लाल साडीसह भडक मेकअप न करता आपल्या स्किन टोनशी मॅच होणारा असा न्यूड मेकअप हिनाने केला आहे. आयशॅडो, आयलायनर, हायलायटर आणि न्यूड लिपस्टिक शेडचा वापर करून तिने आपला मेकअप लुक पूर्ण केला आहे. तर लाल साडीवर हातातील लाल बांगड्या अधिक सुंदर दिसत आहेत.

हेही वाचा :  अनुष्काच्या व्हाईट शर्टच्या जादू पुढे मलायकाचा सिझलिंगअवतारही फिका,तुमच्या लाडक्या कलाकारांचे ख्रिसमस लुक

​आकर्षक विंग्ड आयलायनर​

​आकर्षक विंग्ड आयलायनर​

Winged Eyeliner Style: हिनाचे डोळे मोठे असून तिने या गाऊनसह न्यूड मेकअपचा आधारच घेतला आहे. नैसर्गिक मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तर लक्ष वेधले आहे ते विंग्ड आयलायनरने. त्यासह हायलायटर आणि न्यूड लाईट पिंक लिपस्टिकने हिनाने लुकमध्ये भर टाकलेली दिसून येत आहे.
मलायकाच्या अदांवर तुम्ही फिदा असलात तरीही हिना पांचाळच्या अदाही कुठेच कमी नाहीत. मलायकाला पुरेपूर टक्कर देत आहे ही अभिनेत्री.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …