‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ चा ट्रेलर पाहिलात का?

Mrs Chatterjee Vs Norway Trailer: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही गेली अनेक वर्ष अभिनयक्षेत्रात काम करत आहे. वेगवेगळ्या विषयांवरील आधारित चित्रपटांमध्ये राणीनं काम केलं. सध्या राणी तिच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. राणीच्या ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच, अनेकांनी  या चित्रपटाच्या ट्रेलरमधील राणीच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.  ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’  या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, देविका चॅटर्जी ही तिच्या दोन मुलांसाठी लढा देत आहे. 

‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’  चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राणी ही देविका चॅटर्जी या भूमिकेत दिसत आहे. देविका ही तिची दोन मुलं आणि पतीसोबत नॉर्वेमध्ये राहात असते. ट्रेलरमध्ये दिसते की देविकाच्या दोन मुलांना काही लोक घेऊन जातात. त्यानंतर आपल्या मुलांना परत मिळण्यासाठी देविका ही कोर्टात लढा देताना दिसते. देविकाला तिची मुलं परत मिळतात का? देविकाला नॉर्वेमध्ये कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’  हा चित्रपट पाहिल्यानंतर मिळणार आहेत. हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे. 

हेही वाचा :  कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शहजादा’ चा ट्रेलर पाहिलात?

पाहा ट्रेलर: 


अभिनेत्री अलिया भट्ट आणि करण जोहर यांनी  ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. करण जोहरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लिहिलं की, ‘राणीचा हा आजपर्यंतचा सर्वात चांगला परफॉर्मन्स आहे. ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’


आशिमा चिब्बर यांनी ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’  या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राणी मुखर्जीचा हा चित्रपट आधी 3 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता हा चित्रपट 17 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राणीच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

जन्माच्या वेळी दुसऱ्या बाळासोबत झाली होती राणीची अदला बदल! तुम्हाला माहितीये का ‘हा’ किस्सा?Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …