Dal Bhat Or Dal Chapati : डाळ-भात की भाजी-चपाती? डाएटिशियनकडून जाणून घ्या झटपट वजन घटवण्यासाठी कोणतं कॉम्बिनेशन आहे सर्वात बेस्ट?

लठ्ठपणा (Obesity) ही एक गंभीर समस्या आहे आणि आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत. अर्थात, वजन कमी करणे सोपे काम नाही, परंतु व्यायाम आणि सकस आहार घेऊन यापासून सुटका मिळवता येते. वजन कमी करण्यासाठी डाएटचा विचार केला तर बाजारात खाण्यापिण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे संभ्रम निर्माण होतो की काय खावे? वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांचे (Protein rich foods for weight loss) सेवन केले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

चिकन आणि अंडी हे प्रथिनांचे मजबूत स्त्रोत मानले जातात परंतु ते दररोज खाऊ शकत नाहीत. तथापि, आपण दररोज डाळ मात्र नक्कीच खाऊ शकतो. मूग डाळ, तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ यासारख्या अनेक प्रकारच्या डाळी आहेत, ज्या प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. पण तरीही प्रश्न पडतो की डाळ भात चांगला की डाळ चपाती? वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय आहे? या प्रश्नाचे उत्तर देत आहेत पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ शिखा अग्रवाल शर्मा. (फोटो साभार: istock by getty images)

वजन कमी करण्यासाठी डाळ प्रोटीनचे सर्वोत्तम भांडार

डाळ हे प्रथिनांचे भांडार आहे. 1 वाटी डाळ जवळजवळ 7 ग्रॅम प्रथिनांचा शरीराला पुरवठा करते. तांदळात बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात आणि ते कार्बोहायड्रेट्सचा स्रोत आहे. जेव्हा तुम्ही कोणताही पदार्थ एकत्र बनवता म्हणजेच एक धान्य आणि एक डाळ, तेव्हा त्या जेवणाची प्रोटिन गुणवत्ता सुधारते. चपाती, डाळ यांचेही तसेच आहे. त्यामुळे नुसत्या गव्हाच्या चपात्यांऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, मूग डाळ अशा धान्यांच्या भाक-या बनवा. जर तुम्ही 1 वाटी डाळी बरोबर मल्टीग्रेन चपाती खाल्ल्यास तुम्हाला फायबर, प्रोटीन, बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मिळतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा :  सोनं सत्तरी पार जाणार? 10 दिवसात तब्बल 3430 रुपयांनी महागले, आजचा सोन्याचा दर काय?

(वाचा :- Summer foods for Cholesterol : सावधान, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हार्ट स्ट्रोक व हार्ट अटॅकचा धोका, आताच खायला घ्या ‘हे’ 6 पदार्थ!)

चपाती

चपाती कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्त्रोत आहे, जो तुम्हाला भरपूर ऊर्जा प्रदान करू शकतो आणि तुम्हाला परिपूर्ण ठेवू शकतो. एक चपाती तुमच्या शरीराला विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे जसे की व्हिटॅमिन बी, ई, तांबे, जस्त, आयोडीन, मॅंगनीज, सिलिकॉन यांसारखी खनिजे देते. तुम्ही बीन्स, गाजर, पालक यांसारख्या शिजवलेल्या भाज्या चिरून पीठात घालून त्याची पौष्टिकता आणखी वाढवू शकता.

(वाचा :- हृतिक रोशनच्या 67 वर्षांच्या आईला पाहिलंत का? फिटनेस व फिगर बघून व्हाल हैराण, यासाठी फक्त रोज इतकी पावलं चालते..!)

तुपाची चपाती

चपाती बनवण्यासाठी गव्हाचे पीठ वापरावे आणि ती चपाती तुपाबरोबर खावी. पिठामध्ये नाचणीचे पीठ, सोयाबीनचे पीठ, चण्याचे पीठ, बाजरी आणि बुलगर गहू यांसारखी इतर पीठ मिसळणे देखील एक चांगली कल्पना आहे.

(वाचा :- बापरे! एका विचित्र आजाराने पिडीत रूग्ण तब्बल 2 महिने जगत होता फक्त द्रव पदार्थांवर, कारण जीभेवर उगवत होते ‘काळेभोर केस’!)

हेही वाचा :  लठ्ठपणामुळे नसांमध्ये जमा झाले घाणेरडं Cholesterol, 82 किलोच्या बँकरने 5 महिन्यात केलं जबरदस्त Weightloss

भात

चपातीपेक्षा तांदळात फायबर, प्रोटीन आणि फॅट कमी असते. भातामध्ये स्टार्च असल्याने ते पचायला सोपे असते आणि त्यात फोलेटचे प्रमाणही जास्त असते. पण वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून चपाती हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही भाताशिवाय जगू शकत नसाल तर तुम्ही अधिक डाळींसोबत डाळ खिचडी बनवून खाऊ शकता जेणेकरून तो एका पौष्टिक पद्धतीने पोटात जाईल.

(वाचा :- World Kidney Day 2022 : ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास किडनी आयुष्यभर राहिल हेल्दी आणि पिवळ्या रंगाच्या व दुर्गंध येणा-या लघवीपासून मिळेल मुक्ती!)

मग वजन कमी करण्यासाठी काय योग्य आहे?

प्रथिने आणि फायबर व्यतिरिक्त डाळींमध्ये मॅग्नेशियम आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले असतात. भात आणि चपातीपेक्षा डाळीमध्ये जास्त प्रथिने आणि अमीनो अॅसिड्स असतात. पण जर तुम्ही अधिक फायबरचे स्त्रोत शोधत असाल तर डाळ-चपाती हे चांगले खाद्य संयोजन आहे. तुमचे ध्येय वजन कमी करणे किंवा संपूर्ण आरोग्य सुधारणे हे असले तर तुमच्या आहारात विविध प्रकारचे धान्य समाविष्ट केल्याने तुमचे पोटाचे आरोग्य सुधारू शकते.

हेही वाचा :  World Kidney Day 2022 : ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास किडनी आयुष्यभर राहिल हेल्दी आणि पिवळ्या रंगाच्या व दुर्गंध येणा-या लघवीपासून मिळेल मुक्ती!

(वाचा :- Joint pain remedies : जुन्यातील जुनी सांधेदुखी, गुडघेदुखी व हाडांच्या वेदना होतील झटक्यात दूर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 रामबाण घरगुती उपाय!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …