स्नोबोर्डिंग करताना मुलगी स्वतःशीच बोलते, गोंडस व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल | toddler talks to herself while snowboarding viral video is too cute to handle prp 93


उन्हाळ्याच्या सुरुवातीला चिडचिड वाढत असेल तर हा व्हायरल व्हिडीओ तुमचा मूड फ्रेश करेल. या व्हिडीओमधल्या चिमुकलीचा अल्लडपणा पाहून तुमच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल येईल, हे मात्र नक्की.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला मूड स्वींग आणि चिडचिड वाढणं, लक्ष केंद्रित न करता येणं, या स्वरूपाची लक्षणं जास्त आढळतात. यात तुमचा मूड आणखी फ्रेश करणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली मायक्रोफोन लावून स्नोबोर्डिंग करताना दिसून येतेय. स्लायडिंगचा मनमुराद आनंद घेत असताना ही चिमुकली स्वतःसोबतच बडबड करत होती. तिची ही स्वतःसोबतची बडबड खूपच मोहक आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल., हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मूळतः ‘चेसिंग सेज’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर वर्थ फीड वरून हा व्हिडीओ पुन्हा नव्याने शेअर करण्यात आलाय. बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमधल्या चिमुकलीचं नाव सेज असं असून ती अवघ्या चार वर्षाची आहे. या चिमुकलीच्या पालकांनी तिच्या स्नोबोर्डिंगपूर्वी तिला मायक्रोफोन लावला होता. स्नोबोर्डिंग करताना तिने स्वतःसोबत केलेली बडबड मायक्रोफोनमध्ये रेकॉर्ड केली होती. “मी पडणार नाही, कदाचित पडेल,” असं ती मुलगी तिच्या गोड आवाजात बोलताना दिसून आली.

हेही वाचा :  Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

यावेळी या चिमुकलीने अंगावर डायनासोर स्नोसूट परिधान केल्याने आणखी गोंडस दिसून येत होती. स्नोबोर्डिंग करताना तिने केलेली बडबड सर्व माईकमध्ये रेकॉर्ड झाली. शेवटी ती बर्फात पडली. बर्फाती ती पूर्णपणे अडकून पडली होती. तिच्या वडिलांनी तिला गमतीने विचारलं की, ती कोणत्या प्रकारची डायनासोर आहे.” सुरुवातीला ती म्हणते ‘मी पावडर-सॉरस’ आहे. पण काही सेकंदांनंतर, जेव्हा पडल्यानंतर उठू शकली नाही, तेव्हा ती ‘फसी-ओ-सॉरस आहे, असं बोलताना आवाज ऐकू येतो. लहान मुलाच्या मनातली ही मालिका असावी! ऋषी एक राड लहान मुलगी आहे! पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

आणखी वाचा : हृदयाला भिडणारा चिमुकलीचा VIDEO VIRAL, IPS अधिकाऱ्याने दिला खास संदेश

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशींच्या कळपापासून वाचण्यासाठी सिंह थेट झाडावर चढला, जंगलाचा राजा घाबरला का?

नेटिझन्सना या चिमुकलीचा व्हिडीओ खूपच आवडू लागलाय. माउंट रेनियर नॅशनल पार्कच्या दक्षिण-पूर्व मधल्या एका बर्फाळ वंडरलॅंडमध्ये ही चिमुकली स्नोबोर्डिंग करताना दिसून येत आहे. या गोंडस मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. एका यूजरने लिहिले की, ‘मला हा व्हिडीओ आवडला; दरवर्षी मी माझ्या प्रत्येक मुलाला माइक लावतो आणि त्याचे प्रत्येक व्हिडीओ कायम सेव्ह करतो. त्याचे छोटे छोटे क्षण कॅप्चर करण्याचा हा एक मजेदार आणि सर्जनशील मार्ग आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘तिचा अप्रतिम अनुभव पाहून आनंद झाला.

हेही वाचा :  'तुम्हाला PM व्हायचं आहे ना? हिंमत असेल तर मोदींविरुद्ध...'; BJP चं ममतांना ओपन चॅलेंज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …