सोनं सत्तरी पार जाणार? 10 दिवसात तब्बल 3430 रुपयांनी महागले, आजचा सोन्याचा दर काय?

Gold Silver Price Today in Marathi: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दागिन्यात वाढ झाल्यामुळे खरेदीदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आज (11 मार्च) सोन्याची किंमत जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,190 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. तर सराफा बाजारात आज 74,250 रुपये प्रति किलोने विकले जात आहे. 

डिसेंबरनंतर 2023 थेट मार्च 2024 या महिन्यात सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले. गेल्या दहा दिवसांत दोन्ही धातूंनी मोठा पल्ला गाठला आहे. दहा दिवसांत सोन्याचा भाव 3,430 रुपये तर चांदीच्या दरात 2300 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव खूप जास्त आहेत. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल या अपेक्षेने सोनीचा दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सोनं सत्तरी पार करणार? 

सोन्या-चांदीच्या किमतीत गेल्या 10 दिवसांत मोठी झेप घेतली आहे. 7 मार्च रोजी सराफा बाजारात सोन्याची किंमत 65049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली होती. या काळात सोने 3041 रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, गेल्या 10 व्यापार दिवसांत चांदीचा दर 2374 रुपयांनी वाढला आहे. सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे लग्नाचा हंगाम नसून इतर कारणे आहेत. केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया सोन्याच्या किमतीत विक्रमी उच्चांक गाठण्यामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले,  की कॉमेक्स आणि एमसीएक्सवर सोन्याच्या किमती नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणात अपेक्षित बदल झाल्यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाली आहे. 

हेही वाचा :  Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, पाहा काय आहेत दर...

केडिया म्हणाले की, आधीच सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धादरम्यान इस्रायल आणि हमास यांच्यातील लष्करी संघर्षामुळे जगभरात अनिश्चितता वाढली आहे. जगभरातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहेत. विशेषतः सेंट्रल बँक ऑफ चायना सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे. चिनी नागरिक महागाई आणि देशातील अशांत शेअर बाजार आणि मालमत्ता क्षेत्राविरूद्ध बचाव म्हणून सोन्याचा साठा करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमतीला मोठा आधार मिळाला. अशीच स्थिती राहिली तर लवकरच सोने आपल्या पूर्वीच्या सर्वकालीन उच्चांकी पातळी ओलांडेल. 

10 दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ

मार्च महिन्यात सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. गेल्या दहा दहा दिवसांत प्रचंड महागले असून दरमहा 3,430 रुपयांची वाढ झाली. 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत सोन्याचा भाव 3,430 रुपयांनी वाढला. 1 मार्चला 310 रुपये आणि 2 मार्चला 850 रुपये झाला. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्चला 700 रुपयांनी वाढले. 6 मार्चला 250 रुपयांचे सोने खरेदी केले. 7 मार्चला त्यात 400 रुपयांनी वाढ झाली. 8 मार्चला हाच दर 170 रुपयांवर पोहोचला. 9 मार्चला 540 रुपयांनी वाढले.  GoodReturns नुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत 60,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 66,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हेही वाचा :  Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …