Maharashtra Weather News : राज्यात थंडी वाढणार, या आठवड्यात तापमान कसं असेल ते जाणून घ्या

Weather Updates News : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा (Cold) जोर वाढणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गुलाबी थंडीचा अनुभव लोकांना घेता येणार आहे. (Maharashtra Weather) देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. (Maharashtra cold will intensify) त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवत आहेत. (IMD predicts cold wave conditions in these states over next 24 Hours) दरम्यान, उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी कायम आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट आली आहे.

राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता

उद्यापासून राज्यात थंडी वाढणार असून पुण्यासह राज्यातील काही भागांमध्ये पारा हा 10 अंश खाली येणार आहे. तर येत्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊसाची शक्यता देखील असल्याचं अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात राज्यात थंडीची लाट कायम राहील, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. 

हेही वाचा :  मुंबईलगतच्या शहरातील एका बस स्थानकाला दिले 'बांगलादेश'चे नाव, कारण...

मागील काही दिवसांत महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार 6 ते 9 जानेवारी या कालावधीत विदर्भातील काही भागासह राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. 

मालेगाव, मनमाडला थंडीचा कडाका

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड येथे थंडीची कडाका वाढला आहे. त्यामुळे लोक शेकोटीचा आधार घेत आहेत. दरम्यान, थंडीमुळे जनजीवनावरही परिणाम दिसून येत आहे. मॉर्निंग वॉक निघणारे लोक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावरील सकाळची गर्दी कमी झालेय. तसेच सर्दी आणि खोकला यामध्ये वाढ झाली आहे.

नाशिकच्या मालेगाव, मनमाडसह ग्रामीण भागात थंडीची लाट आल्याने लोक चांगलेच गारठले आहे. वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला असून गोठवणाऱ्या थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले रस्ते ओस पडले आहेत. थंडीचा रब्बी पिकांना चांगला फायदा होणार आहे.

हेही वाचा :  दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका; पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी कायम 

उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी कायम आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि यूपीमध्ये थंडीची लाट आली आहे. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील तीन दिवस थंडी कायम राहिल. तसेच आयएमडीनेही रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र, पुढील काही दिवस दिल्लीत दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दिल्लीत आज ऑरेंज अलर्ट जारी 

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, देशाच्या राजधानीला पुढील 72  तास कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. दिल्लीत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. IMD नुसार, 5 ते 7 जानेवारी दरम्यान दिल्लीचे किमान तापमान 4 अंशांच्या दरम्यान आणि कमाल तापमान 17-18 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. हवामान खात्याच्या या अंदाजानुसार दिल्लीत पुढील 3 दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

Sam Pitroda : वारसा हक्काची 55% संपत्ती सरकारजमा होणार? अमेरिकेतील कायदा, भारतात वादंग

Inheritance Tax In india : सॅम पित्रोदा… अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष… माजी पंतप्रधान राजीव गांधी …