खर्चापेक्षा बचत भारी! एकाच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT फ्री

मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या ग्राहक जोडण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. आधीच टेलिकॉम कंपन्यांनी प्लॅनची किंमत वाढवल्याने ग्राहक वैतागले आहेत. त्यातही स्वस्त आणि सर्वात जास्त फुकट सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपनीकडे ग्राहकांचा कल अधिक असतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता jio चे ग्राहकांसाठी खास प्लॅन आणले आहेत. 

तुम्ही जर Jio चे ग्राहक असाल तर तुम्हाला या सिक्रेट प्लॅनबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ग्राहक नसाल तर या प्लॅनबद्दल विचार करू शकता कारण हे प्लॅन भन्नाट आहेत. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि OTT प्लॅटफॉर्म मिळणार आहे. 

एक साधारण विचार केला तर एका माणसासाठी नेटफ्लिक्सचा 199 रुपये सबस्क्रिप्शनचा खर्च आहे. तर अमेझॉन प्राईम 179 आणि डिझनी प्लस आणि हॉटस्टार 299 म्हणजे एकूण पैसे जातात 677 रुपये. त्याऐवजी जर तुम्ही जर एक जिओचा प्लॅन घेतला तर तुम्हाला त्यासोबत OTT मधील अॅपचं फ्री सब्स्क्रिप्शन मिळतं. 

ग्राहकांना जिओ प्राईमसाठी 99 रुपये वेगळे भरावे लागणार आहेत. यामध्ये महिन्याला 100 SMS आणि अनलिमिटेड वॉईस कॉलिंग मिळणार आहे. सर्व प्लॅनची व्हॅलिडिटी बिल सायकलनुसार होणार आहे. 

हेही वाचा :  भन्नाट! आता IRCTC वर पैसे न देता तिकीट बुक करू शकतील Paytm युजर्स, पाहा पूर्ण प्रोसेस

कोणते प्लॅन आहेत ज्यामध्ये OTT मिळतं? 

399 पोस्ट पेड प्लॅन – यामध्ये तुम्हाला तिन्ही OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे. हा प्लॅन एका महिन्यासाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये केवळ महिन्याला 75GB ग्राहकांना मिळणार आहे.

599 पोस्ट पेड प्लॅन –  नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि डिझनी प्लस आणि हॉटस्टार या तिन्ही अॅपचं तीन महिन्यांसाठी सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100GB डेटा वापरण्यासाठी मिळणार आहे. 

799 पोस्ट पेड प्लॅन – या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला तिन्ही प्लॅटफॉर्म फ्री मिळणार आहेत. या तिन्ही प्लॅनमध्ये केवळ डेटाचा फरक आहे.  150GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Redmi घेऊन येतोय भन्नाट स्मार्टफोन, 6 डिसेंबरला ग्लोबल लाँच, किंमत आणि फिचर्स वाचा

Redmi 13C: Redmi च्या चाहत्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेडमी एक नवीन …

Tata कंपनीत नोकरी हवी? iPhone कव्हर बनवण्यासाठी हवेत हजारो कामगार!

Tata iPhone Manufacture:  भारतीय बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी असलेली टाटा आता भारतात आयफोनची निर्मिती करणार आहे. …