Breaking News
  • कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 उशिराने, प्रवाशांचे हाल
  • Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू
  • आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा
  • Amazon Great Indian Festival 2023 सेल या दिवसापासून होणार सुरू, यावर भरघोस ऑफर्स
  • Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस

“मुख्यमंत्री मानसिक रुग्ण, त्यांना उपचाराची गरज आहे”; राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले!


आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राहुल गांधी यांच्यावरील हेमंत बिस्वा शर्मांच्या वक्तव्याचा निषेध करत पटोले म्हणाले, “बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांची पातळी दाखवून देणारं आहे. भाजपातील वरिष्ठ नेत्यांपासून अनेक नेत्यांना विरोधकांवर अशी वैयक्तिक टीका करुन त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दलही हीन दर्जाचा शब्दप्रयोग भाजपा नेत्यांनी वारंवार केला आहे. त्यांची हीच संस्कृती आहे मात्र काँग्रेसची ही संस्कृती नाही”.

बिस्वा शर्मा यांना या रोगापासून आराम मिळो अशी आमची सदिच्छा आहे. बिस्वा शर्मा यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत त्यांचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोमणाही पटोले यांनी मारला.

पटोले पुढे म्हणाले, “लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्यामुळे एक जबाबदार विरोधीपक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला. भाजपाने त्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही परंतु भाजपा हा लोकशाही व संविधानाला मानत नाही. भाजपाचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असतात.”

बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत, बोलताना काही ताळतंत्र बाळगण्याची आवश्यकता असते मात्र त्यांच्यावरचे संस्कारच तसे आहेत, देव त्यांना सदबुद्धी देवो हीच आमची सदिच्छा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

The post “मुख्यमंत्री मानसिक रुग्ण, त्यांना उपचाराची गरज आहे”; राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले! appeared first on Loksatta.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …