हिजाब घालणं ही बाब मला चुकीची वाटत नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. यामुळे कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शिक्षण संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असून त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
Karnataka Hijab Row : कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; सुनावणीसाठी प्रकरण दुसऱ्या खंडपीठासमोर
“देशात कोण काय खाणार, कोण काय घालणार, हे आता भाजपा आणि संघ परिवार ठरवणार आहेत. हे नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, मुस्लीम मुली शाळा-कॉलेजात जात आहेत, शिक्षण घेत आहेत, ही अडचण भाजपा आणि संघाला आहे का?, असं म्हणत बेटी पढाओ या नारेबाजीचे काय झाले,” असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
“मुस्लीम मुली शिक्षण घेऊन समाजात त्यांचं स्थान निर्माण करत आहेत, याची भाजपा आणि संघाला अडचण आहे, हा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. ओढणी ही भारतीय संस्कृती आहे. कोणालाच चेहरा लपवून शाळेत जावं वाटत नाही. हिजाबचा अर्थ केस आणि चेहरा झाकणं असा होतो, मला नाही वाटत की त्यात कोणतीही अडचणीची बाब आहे. यापूर्वी केरळ हायकोर्टाने मुली हिजाब घालू शकतात, असा आदेश दिलेला आहे. याप्रकरणी आता कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सूरू आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी केला गेलाय,” असंही नवाब मलिक म्हणाले.
“त्या’ महिला खासदारांना डोक्यावरून पदर काढायला सांगणार का?” हिजाब वादावर इम्तियाज जलील यांचा सवाल!
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात येणार, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसेच नागपुरात संयुक्त सभागृह नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणं शक्य नसल्याचं नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.