आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यात मुख्य भूमिका साकारात आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला चौफेर विरोध होताना दिसतोय. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या विरोधात आज कामाठीपुरा येथील स्थानिक नागरिकांनी बॅनर, पोस्टर हाती घेऊन घोषणाबाजी केली.

चित्रपटात जसे कामाठीपुराचे चित्रण करण्यात आले आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचा आरोप या लोकांनी केला आहे. या ठिकाणी एकूण 42 गल्ल्या आहेत, ज्यामध्ये सुमारे 30 हजार लोक राहतात. तर, यातील फक्त 3 गल्ल्यांमध्ये सेक्स वर्कर राहतात.

कामाठीपुरा जवळपास 250 वर्ष जुना आहे. इथे अनेक इंजिनीअर, पायलट, डॉक्टर राहतात. पण, या चित्रपटामुळे ते नाहक बदनाम होतात, मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, इंटरव्ह्यूमध्येही मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो, असे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळेच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

कुटुंबीयांचा देखील चित्रपटाला विरोध!

गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी देखील या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून, याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलाचे म्हणणे आहे की, ट्रेलर पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या एका महिलेला या चित्रपटात केवळ कामाठीपुरातील एक व्यक्ती दाखवलं आहे.

हेही वाचा :  Gangubai Kathiawadi : बांगड्या, टिकली, झुमके, अन् काळा चष्मा; आलियाची स्टाईल विदेशात हिट

गंगूबाई यांचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह यांनी 2021मध्येही या चित्रपटाबाबत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना समन्स बजावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि निर्मात्यांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. याबद्दल बोलताना बाबू रावजी शाह म्हणाले की, ‘माझ्या आईला एका वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये बसवण्यात आलं आहे. आता लोक विनाकारण माझ्या आईबद्दल काहीही बोलत आहेत.’

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मनाला भिडणारा ‘भीड’; संवदेशनशीलता हरवलेल्यांसाठी आरसा

Bheed Drama Director: Anubhav Sinha Starring: Rajkummar Rao, Bhumi Pednekar, Dia Mirza,Ashutosh Rana, Pankaj Kapur, …

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांनी घेतली चंद्रपूर पोलीसांची भेट

Ghar Banduk Biryani: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत …