अशी आहे टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून खास जर्सी लॉन्च

 मुंबई, 18 सप्टेंबर: येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. आणि आता बीसीसीआयनं वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या नव्या टी20 जर्सीचं अनावरण केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ ही नवी जर्सी घालून खेळताना दिसणार आहे.

कशी आहे नवी जर्सी?

गेल्या वर्षी टी20 वर्ल्ड कपसाठी 1992 सालच्या भारतीय संघाच्या जर्सीसारखी जर्सी डिझाईन करण्यात आली होती. पण यावेळी बीसीसीआयनं नवी जर्सी लॉन्च केली आहे. स्काय ब्ल्यू कलरची ही जर्सी आहे. त्यावर पुढे मुख्य स्पॉन्सर बायजूज आणि एमपीएलचा लोगो असून मध्यभागी इंडिया लिहिलेलं आहे. तर छातीवर बीसीसीआयचा लोगो आहे.

 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण

ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहे. 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सामन्यांना सुरुवात होईल. तर 23 ऑक्टोबरला भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडेल.

वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग

स्टँड बाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

पराभवानंतर हताश रोहित शर्माने दिला गंभीर इशारा; टी-२० वर्ल्डकपच्या आधी सुधारा नाही तर…

मोहाली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत (Ind vs Aus) भारताने ४ विकेटनी गमावली. टीम …

टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

मोहाली, 20 सप्टेंबर: हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं मोहाली टी20त भारतीय बॉलर्ससाठी बऱ्याच …