रविवारी होणार अनावरण
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या खास जर्सीचं अनावरण रविवारी होणार आहे. रविवारी रात्री आठ वाजता बीसीसीआयकडून या जर्सीचं लाँचिंग करण्यात येणार आहे. याआधी बीसीसीआयनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत या जर्सीची झलक दाखवली होती.
5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण
ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहे. 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सामन्यांना सुरुवात होईल. तर 23 ऑक्टोबरला भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडेल.
हेही वाचा – Cricket: विराट कोहलीचा टीममेट करतोय धावांची बरसात, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ठोकली लागोपाठ शतकं
वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग
स्टँड बाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या