फखर झमान संघाबाहेर
पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखऱ झमान गेल्या काही सामन्यात सपशेल अपयशी ठरला. आशिया कपमध्येही त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे वर्ल्ड कपसाठीच्या संघातून त्याला वगळून स्टँड बाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे. याच फखर झमाननं 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या हातून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी निसटली होती.
शाहीन आफ्रिदीचं कमबॅक, नसीमला लॉटरी
पाकिस्तानच्या या संघात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनं कमबॅक केलं आहे. आशिया कपमध्ये शाहीन आफ्रिदी गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. पण आता तो फिट झाला असून वर्ल्ड कपसाठीच्या संघात आफ्रिदीची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहला लॉटरी लागली आहे. आशिया कपमधल्या दमदार प्रदर्शनामुळे नसीमला चक्क ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळालं आहे. नसीम शाहनं केवळ गोलंदाजीतच नाही तर आशिया कपमध्ये बॅटनही कमाल दाखवली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सलग दोन षटकार खेचून सामना जिंकून दिला होता.
Introducing our squad 🙌
🗒️ https://t.co/JnHpDOvXsS#T20WorldCup | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/BbmTdtBfhk
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 15, 2022
पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, असिफ अली, हैदर अली, हॅऱिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मज वसीम, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर
स्टँड बाय खेळाडू – फखर झमान, मोहम्मद हॅरिस, शाहनवाज दहानी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या