लेव्हर कप फेडररच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा, पाहा कधी खेळणार शेवटचा सामना?

मुंबई, 15 सप्टेंबर:  रॉजर फेडररनं टेनिसमधून अचानक निवृत्ती घेतली आणि कोट्यवधी टेनिसप्रेमींना धक्का बसला. खरं तर गेले दीड वर्ष फेडरर टेनिसपासून दूर होता. दुखापती, त्यामुळे झालेल्या शस्त्रक्रियांमुळे गेल्या 10 पैकी केवळ 2 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्येच तो खेळला. आणि आज त्यानं अचानकपणे टेनिसमधून निवृत्तीही स्वीकारली. यापुढे फेडरर ग्रँड स्लॅममध्ये खेळताना दिसणार नाही, पण या आठवड्य़ाच्या शेवटी होणारी लेव्हर कप ही फेडररच्या कारकीर्दीतली अखेरची स्पर्धा ठरेल.

लेव्हर कपमध्ये फेडररला निरोप

पुढच्या आठवड्यात लंडनमध्ये लेव्हर कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा एक टीम इव्हेंट आहे. युरोप आणि जगातल्या इतर देशातल्या अव्वल टेनिसपटूंमध्ये ही स्पर्धा रंगते. या स्पर्धेत फेडरर टीम युरोपचं प्रतिनिधित्व करतो. फेडररसह स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा नोवाक ज्योकोविच हेही टीम युरोपध्ये आहेत.

लंडनमध्ये होणारा यंदाचा लेव्हर कप खास ठरणार आहे. कारण या स्पर्धेत महान टेनिसवीर रॉजर फेडरर अखेरची स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे टेनिसप्रेमींसाठी ती एक फार मोठी पर्वणी ठरावी.

कधी होणार लेव्हर कपचे सामने?

22 सप्टेंबरला लेव्हर कप स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना खेळवला जाईल. तर रविवारी 25 सप्टेंबरला स्पर्धेची अंतिम लढत होईल. लंडनच्या O2 अरेनामध्ये हे सामने खेळवण्यात येतील.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

वर्ल्ड कपसाठी पाकिस्ताननं केली टीमची घोषणा, भारताविरुद्ध शतक केलेला खेळाडू ‘आऊट’

मुंबई, 15 सप्टेंबर: आगामी टी20 वर्ल्डकपसाठी जवळपास सगळ्या संघांनी 15 सदस्यीय टीम घोषित केली आहे. …

T 20 world cup 2022साठी पाकिस्तानचा संघ जाहीर, भारताला नडणारा खेळाडू टीम बाहेर…

नवी दिल्ली : ICC T20 world 2022 साठी पाकिस्तानने १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. …