ऋतुराज गायकवाड टीम इंडियासाठी ठरला संकटमोचक, न्यूझीलंडविरुद्ध ठोकलं झुंजार शतक

मुंबई, 15 सप्टेंबर: भारतीय संघात निवड झालेला पण तरीही फारशी संधी न मिळालेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं संघव्यवस्थापनाला  पुन्हा एकदा आपल्या बॅटनं उत्तर दिलं आहे. ऋतुराजनं बंगळुरुत सुरु असलेल्या न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकलं. त्यानं 108 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे भारत अ संघानं सर्वबाद 293 धावा केल्या.

ऋतुराजचं चौथं फर्स्ट क्लास शतक

25 वर्षांच्या ऋतुराजच्या प्रथम श्रेणी कारकीर्दीतलं हे चौथं शतक ठरलं. पहिल्या दिवशी भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाळनं टॉस जिंकून फलंदाजीच निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. त्यामुळे भारतीय संघाची एकवेळ 4 बाद 111 अशी अवस्था झाली होती. तेव्हा ऋतुराजनं उपेंद्र यादवच्या साथीनं संघाचा डाव सावरला. ऋतुराजनं 127 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपली 108 धावांची खेळी सजवली. तर उपेंन्द्र यादवनं 76 धावा केल्या.

6 फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद

भारत अ संघाचे 6 फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरले. ज्यात कर्णधार प्रियांक पांचाळ आणि रणजी सीझन गाजवलेल्या सर्फराज खानचाही समावेश आहे. न्यूझीलंडच्या आक्रमणासमोर दिवसाच्या शेवटी भारताचा डाव 293 धावात संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून मॅथ्यू फिशरनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

वर्ल्ड कपसाठी पाकिस्ताननं केली टीमची घोषणा, भारताविरुद्ध शतक केलेला खेळाडू ‘आऊट’

मुंबई, 15 सप्टेंबर: आगामी टी20 वर्ल्डकपसाठी जवळपास सगळ्या संघांनी 15 सदस्यीय टीम घोषित केली आहे. …

लेव्हर कप फेडररच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा, पाहा कधी खेळणार शेवटचा सामना?

मुंबई, 15 सप्टेंबर:  रॉजर फेडररनं टेनिसमधून अचानक निवृत्ती घेतली आणि कोट्यवधी टेनिसप्रेमींना धक्का बसला. खरं …