रोहितचा रोल बदलणार?
अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं विश्रांती घेतली. रोहितच्या जागी उपकर्णधार लोकेश राहुल नाणेफेकीसाठी मैदानात आला आणि त्यानं रोहित शर्मानं विश्रांती घेतल्याचं सांगितलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितसह हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहललाही विश्रांती देण्यात आली. दरम्यानं रोहितनं विश्रांती घेतल्यामुळे सलामीला रोहितच्या जागी विराटला बढती मिळाली. या संधीचा विराटनं पुरेपूर फायदा उठवला आणि त्यानं शतक ठोकलं. इतकंच नव्हे तर लोकेश राहुलसह 119 धावांची सलामीही दिली. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियानं केलेली ही चाचपणी असण्याची आणि रोहित शर्मा सलामीला येण्याऐवजी मधल्या फळीत खेळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
A good start in the Powerplay from India’s openers 💪#INDvAFG | #AsiaCup2022 | Scorecard: https://t.co/z8iw8dn85Q pic.twitter.com/xScSuMUa0C
— ICC (@ICC) September 8, 2022
विश्वचषकाआधी विराट फॉर्मात
येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. आशिया चषकात भारताचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी विश्वचषकाआधी विराट कोहलीचं फॉर्मात येणं टीम इंडियाच्या दृष्टीनं समाधानाची बाब आहे. विराटनं या स्पर्धेत 4 सामन्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांसह 254 धावा केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या