भारताने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी २१३ धावांचे विजयासाठी आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला पहिल्याच षटकापासून धक्के बसायला सुरुवात झाली. भारताच्या गोलंदाजांनीही या सामन्याक कमाल केल्याचे पाहायला मिळाले. भुवनेश्वर कुमारने अफगाणिस्तानच्या पहिल्या चार फलंदाजांना बाद करत त्यांचे कंबरडेच मोडले. आतापर्यंत ट्रोल होणाऱ्या अर्शदीप सिंगनेही यावेळी भेदक मारा केला आणि अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीला फक्त एका धावेवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वरने या सामन्यात अस्मातुल्लाह ओमरझाईला बाद केले आणि आपला पाचवा बळी मिळवला. त्यानंतर दीपक हुडानेही अफगाणिस्तानला अजून धक्का दिला.
तत्पूर्वी, भारताने विराट कोहलीच्या तुफानी शतकाच्या जोरावर २१२ धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. पण या सामन्यात त्याला पुन्हा एकदा लय सापडल्याचे पाहायला मिळाले. विराटने यावेळी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा चांगलाचच समाचार घेतला. कोहलीने यावेळी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७१वे शतक पूर्ण केले. कोहलीने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांसह १०० धावा पूर्ण केल्या. कोहलीचे हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. कोहलीने यावेळी ६१ चेंडूूंत १२ चौकार आणि सहा षटाकरांच्या जोरावर नाबाद १२२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तान भारताच्या फलंदाजीपुढे निष्प्रभ झाल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या पॉवर प्ले पर्यंतच या दोघांनी दमदार फटकेबाजी केली असे नाही, तर त्यानंतरही या दोघांनी गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळेच भारताला यावेळी शतक सलामी मिळाली. लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी यावेळी भारताला ११९ धावांची सलामी दिली. ही सलामी म्हणजे भारताच्या विजयाचा पाया असल्याचे म्हटले जात होते. पण राहुल बाद झाला आणि ही जोडी फुटली. राहुलने यावेळी ४१ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. पण तो बाद झाल्यावरही कोहलीने धडाकेबाज फटकेबाजी करत आपले शतक झळकावले.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या