भारताच्या लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी यावेळी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. स्थिरस्थावर झाल्यावर तर या दोघांनी चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमध्ये अफगाणिस्तान भारताच्या फलंदाजीपुढे निष्प्रभ झाल्याचे पाहायला मिळाले. पण पहिल्या पॉवर प्ले पर्यंतच या दोघांनी दमदार फटकेबाजी केली असे नाही, तर त्यानंतरही या दोघांनी गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळेच भारताला यावेळी शतक सलामी मिळाली.
लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी यावेळी भारताला ११९ धावांची सलामी दिली. ही सलामी म्हणजे भारताच्या विजयाचा पाया असल्याचे म्हटले जात होते. पण राहुल बाद झाला आणि ही जोडी फुटली. राहुलने यावेळी ४१ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. या सामन्यात त्याला ६ धावांवर समाधान मानावे लागले. पण एका बाजूने कोहली दमदार फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने आपले अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर तो गोलंदाजीवर तुटून पडला. सूर्यकुमार बाद झाल्यावर त्याला रिषभ पंतची साथ मिळाली.
आजच्या सामन्यासाठी संघात मोठे बदल…
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले. रोहित शर्माला यावेळी संघाबाहेर करण्यात आले. त्यामुळे भारताचे कर्णधारपद कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न होता. पण भारतीय संघाने या प्रश्नाचे उत्तर सोडवले आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद या सामन्यासाठी लोकेश राहुलला देण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय संघात अजून तीन बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात दिनेश कार्तिक, दीपक चहर आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघातून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या