IND vs AFG : भारतीय संघात मोठा बदल… अवेश खानच्या जागी मॅचविनर खेळाडूला दिली संधी

दुबई : भारताला अवेश खानच्या रुपात दुसरा मोठा धक्का बसला, तो आता या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्याच्या जागी आता भारतीय संघात एका मॅचविनर खेळाडूची एंट्री झाली आहे.

पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी तापामुळे अवेश आपल्या रुमबाहेरच आला नाही, त्यामुळे त्याला सरावही करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आता अवेश संघाबाहेर होता. त्यानंतर अवेश हा आता या स्पर्धेत खेळू शक नाही, अशी अपडेट भारतीय संघाने दिली होती. आता अवेशच्या जागी भारतीय संघात वेगवान गोलंदाज दीपक चहरला प्रवेश दिला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात झोकात पुनरागमन करणारा आणि भारतासाठी मॅचविनर ठरलेला दीपक चहर आता
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दीपक हा भारताकडून गोलंदाजी करताना दिसू शकतो.

रवींद्र जडेजाच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. जडेजाच्या जागी भारतीय संघात अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला. त्यानंतर अवेश खानही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. पण अवेशच्या जागी अजूनही बदली खेळाडूची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे अवेशची जागा कोण घेणार, यावर चर्चा करण्यात आली. अवेश खानने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती. अवेशने गेल्या सामन्यात पाकिस्तानच्या फखर झमानला बाद करत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले होते. पण आता तो या स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतीय संघाचे या स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आले आहे. कारण पाकिस्तानने अफगाणिस्तानवर विजय साकारला आणि तिथेच भारतीय संघ या स्पर्धेतून बाद झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता हा सामान एक फक्त औपचारिकता असेल. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला प्रयोग करण्याची नामी संधी असेल. त्यामुळे आता या सामन्यात भारतीय संघ कोणाला संधी देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कदाचित रोहित शर्मालाही या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

स्मृतीचं शतक हुकलं, टीम इंडियानं इंग्लंडला पहिल्या वन डेत धू धू धुतलं

होव-इंग्लंड, 18 सप्टेंबर: सलामीवीर स्मृती मानधनाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघानं इंग्लंडचा पहिल्या वन …

अशी आहे टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून खास जर्सी लॉन्च

 मुंबई, 18 सप्टेंबर: येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. या …