जडेजा ‘आऊट’ अक्षर ‘इन’, सिलेक्टर्स आणि रोहितकडून या खेळाडूवर अन्याय?

मुंबई : आशिया कपचे सामने सुरू आहेत. रविवारी पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँग विरुद्ध दोन सामने जिंकले आहेत. रविवारी होणारा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

रविंद्र जडेजा दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर पडला आहे. तर अक्षर पटेलला टीममध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. याआधी तो स्टँडबाय खेळाडू म्हणून टीममध्ये होता. मात्र अक्षर पटेल टीममध्ये इन झाल्याने क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. असा एक स्टँडबाय खेळाडू आहे ज्याला पहिली संधी मिळणं अपेक्षित होतं.

सिलेक्टर्स आणि रोहितने मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं त्यामुळे या खेळाडूवर अन्याय झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो आशिया कपमधून बाहेर पडला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरला खेळण्याची संधी देणं अपेक्षित होतं. यासाठी तो मोठा दावेदार मानला जात होता, मात्र त्याऐवजी पटेलला संधी दिली. दीपक चाहरला स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.

दीपक चाहरला जिथे जिथे संधी मिळाली तिथे त्याने उत्तम कामगिरी करुन दाखवली आहे. टीम इंडियाकडून त्याने केवळ 9 वन डे सामने खेळले असून 15 विकेट्स घेतल्या आहेत. तर 20 टी 20 सामने खेळले असून 26 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोघांनी आशिया कप 2022 च्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ४ मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (४ सप्टेंबर) सामना रंगणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला होता. टीम इंडियाला जडेजाची कमतरता भासू शकते.

Published by:Kranti Kanetkar

First published:

Tags: Axar patel, Ravindra jadeja, Team india

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous रणबीर कपूरची तेलुगू पाहून राजामौलींनी केलं असं काही…..VIDEO होतोय तुफान VIRAL
Next Urfi Javed च्या नव्या लुकवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Check Also

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, मोहम्मद शमी संघाबाहेर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या …

ठरलं… टीम इंडियासोबत वर्ल्ड कपसाठी ‘हे’ खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाणार!

मुंबई, 17 सप्टेंबर: 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी जवळपास …