#BoycottBollywoodबाबत ‘कलाकारांना सद्बुद्धी द्या’ असं का म्हणाला श्रेयस तळपदे ?

मुंबई,  08 सप्टेंबर : गेली अनेक दिवस सोशल मीडियावर बायकॉट बॉलिवूड ट्रेंड सगळ्यांची डोकेदुखी ठरली आहे.  लाला सिंह चड्ढा सिनेमावरुन निर्माण झालेला वाद आजही थांबला नाही. परिणामी प्रेक्षकांनी बॉलिवूड सिनेमांकडे पाठ फिरवलेली आहे. यावर प्रतिक्रिया देताना बॉलिवूड कलाकारांनी केलेल्या वक्तव्यांवरुन बायकॉट बॉलिवूड ट्रेंडनं आणखी जोर धरला आहे. यावर अभिनेता श्रेयस तळपदेनं प्रतिक्रिया दिली आहे.  न्यूज 18 लोकमतच्या ‘बाप्पा विथ गप्पा’मध्ये श्रेयस सहभागी झाला होता.

अभिनेता अर्जुन कपूर, आलिया भट्ट, आमिर खान यांनी प्रेक्षकांना ट्रोलिंगवरुन सुनावलं. ‘तुम्हाला सिनेमा पाहायचे नसतील तर पाहून नका पण सिनेमा बॉयकॉटची मागणी करू नका’. तर अभिनेता अर्जुन कपूरनं देखील ‘ट्रोलिंग सहन करून घेतली जाणार नाही यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे’, असं वक्तव्य केलं होतं.

हेही वाचा – Shreyas Talpade Exclusive: एकेकाळी बाप्पावर रागवलेला श्रेयस आता ‘या’ कारणामुळे करत नाही गणपतीचं विसर्जन


बाप्पा विथ गप्पा या स्पेशल शोमध्ये श्रेयसला बाप्पाकडे तुझं काय मागणं आहे? असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देत श्रेयस म्हणाला, ‘सध्या इंडस्ट्रित जी काही स्टेटमेंट्स केली जात आहेत ती मला
पटण्यासारखी वाटत नाहीत. इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आम्हा सगळ्यांन सद्बुद्दी दे, अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी आहे.   कारण सध्या जे काही स्टेटमेंट्स आले आहेत ते मला फारसे पटणारे नाहीत’, असं श्रेयस म्हणाला.

हेही वाचा – Majhi tujhi reshimgath मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, नेहा, यश आणि परीचा शेवटचा सीन कसा असेल?

श्रेयस पुढे म्हणाला,  ‘तुम्ही जर एखाद्यावर प्रेम करता, तुमची गर्लफ्रेंड असेल आणि ती तुमच्यावर नाराज असेल तर तुम्ही तिला असं म्हणत नाही ना की निघून जा.  तुम्ही तिला थांबवण्याचा तिला पटवण्याचा प्रयत्न कराल.  मला असं वाटतं की, प्रेक्षक ही आमची गर्लफ्रेंड आहे. ते जर आमच्यावर नाराज असतील तर त्यांना मनवण्याची आमची ड्यूटी आहे.  त्यांना आम्ही विचारायला हवं की काय झालंय? तुम्ही का नाराज आहात?  आमचं काही चुकत आहे का? चुकलं असेल तर त्यासाठी आम्ही माफी मागतो’.

‘चित्रपटसृष्टीतील काही जण काहीही म्हणत असले तरी तुम्ही आमची कामं बघा. आमचे सिनेमा पाहा. ओटीटीवर आमच्या मालिका पाहा. कारण प्रेक्षकांनी आमची काम नाही पाहिली  तर कलाकारांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ नाहीये, असंही श्रेयस शेवटी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

हृतिक सैफची धमाकेदार एक्शन; विक्रम वेधाचा ढासू ट्रेलर आऊट

मुंबई, 08 सप्टेंबर : गेली अनेक दिवस ज्या सिनेमाची तूफान चर्चा होती त्या ‘विक्रम वेधा’ …

Santosh Juvekar चा नवा प्रोजेक्ट लवकरच येणार भेटीला; समोर आलं फर्स्ट पोस्टर

मुंबई, 8 सप्टेंबर : देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच …