घनदाट लांब केसांसाठी करा या गोष्टीचा वापर, दोन आठवड्यात रिझल्ट नक्की

केसांवर आणि टाळूवर कांद्याचा रस लावल्याने होणारा फायदा तुम्ही अनेकांकडून ऐकलेच असेल. अनेक तज्ञ लोकांचा असा दावा आहे कांद्यांच्या रसामुळे केस गळती थांबते आणि नवीन केस वाढू लागतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री देखील आहेत ज्यांना याची १००% खात्री आहे. याच कारणामुळे त्या बिधास्तपणे कांद्याच्या तेलाचा वापर करतात. बिपाशा बसू असो किंवा ट्विंकल खन्ना असो महागड्या ट्रिटमेंट सोबत कांद्याचा रस देखील केसांना लावतात. पण या गोष्टीचा योग्य वापर करणे गरजेचं असतं चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पद्धताने तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करु शकता.
(फोटो क्रेडिट्स: [email protected])

​ट्विंकल खन्ना

अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने एका मुलाखतीत तिच्या केसांबद्दल सांगताना बोलली होती. की ती कांद्याचे तेल लावते. यासंबंधीत माहिती तिने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला , ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितले की ती या भाजीचा रस देखील लावते. नैसर्गीक गोष्टींचा वापर करुन ती केसांची काळजी घेते. ट्विंकलने शेअर केले की ती कांद्याचा रस काढते आणि टाळूवर लावून थोडा वेळ मसाज करते. 20 मिनिटे केस तसेच ठेवल्यावर ती केस धुते. या रसामुळे तिच्या केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. (फोटो क्रेडिट्स: [email protected])

(वाचा :- गेलेले केस पुन्हा येतील व हेअरफॉल पूर्णपणे थांबेल, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितले केसांसाठी 3 घरगुती पदार्थ)

​मलायका अरोरा

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे , ज्यामध्ये तिने केसांना कांद्याचा रस कसा लावला हे सांगितले आहे. ती सर्वप्रथम कांदा किसून त्याचा रस गाळून घेते. हा रस ती कापसाच्या बॉलच्या मदतीने केसांच्या मुळांना लावते. थोडा वेळ ठेवल्यानंतर ती पॅराबेन फ्री शॅम्पूने केस धुते . कांद्याचा रस वापरल्याने फक्त एका आठवड्यात फरक पडतो, असं मलायकाने सांगितलं आहे. (फोटो क्रेडिट्स: [email protected])

(वाचा :- World Coconut Day: नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे आश्चर्यकारक फायदे,आता टॅनिंगची समस्या होणार कायमची दूर)

​बिपासा बसू

बिपाशा बसूनेही तिच्या सुंदर केसांच्या काळजीचा घेणारा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यासाठी ती 2 मोठे कांदे घेते आणि त्यांना बारीक करून, रस गाळून घेते. ती टाळूवर रस लावते आणि काही मिनिटे मालिश करते. ती रस तासभर डोक्यावर राहू देते आणि नंतर केस धुते. शेवटी, बिपाशा कंडिशनर लावते आणि धुवून टाकते. (फोटो क्रेडिट्स: [email protected])

(वाचा :- प्रियांका चोप्राचे लॉस एंजेलिसमधील अलिशाल घर, पण तिच्या चेहऱ्यावरील चमक घरा पुढेही फिकी)

​असा होईल फायदा

बिपाशा आठवड्यातून एकदा कांद्याचा रस टाळूवर लावते. यामुळे त्यांचे केस गळणे कमी झाले आणि केसांची वाढ वाढली. तिने तिच्या चाहत्यांना असेही सांगितले की जरी ती साधा रस लावत असली तरी त्यात खोबरेल तेल, लॅव्हेंडर तेल आणि लिंबू देखील घालू शकतात.

(वाचा :- चेहऱ्यावरील पिंपल्सवर करा योगाने मात , बाबा रामदेवांनी सांगितली आसने )

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

आळस व अशक्तपणाने जखडून ठेवलंय? डॉक्टरांनी सांगितलेले हे 3 व्हिटॅमिन्स

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची आवश्यकता आपल्या शरीराला तशी कमी प्रमाणात लागते पण आपल्या शरीरात होणाऱ्या विविध …

सिल्कची साडी मोठा नेकलेस घालून अंकिता लोखंडेचा पारंपारिक लूक

बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या अधिक पारंपारिक लूकमध्ये दिसू लागली आहे. अंकिता पारंपारिक आणि बोल्ड …