पण आपल्या आजींच्या पोटडीत अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे तुमच्या केसांची चांगली वाढ होऊ शकते. बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांमुळे केसांना त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही देखील हे उपाय करु शकता.
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)
जास्वंदीचा वापर
केसांच्या वाढीसाठी जास्वंदीचा वापर खूप फायदेशीर ठरतो. यासाठी 1जास्वंदीचे फूल, 1 टीस्पून मेथी दाणे ,1 टीस्पून नारळ तेल , 1 मूठभर गोड कडुलिंब , १ कप दही घेऊन हे मिश्रण केसांना लावा. काही मिनीटांनी केस धुवून टाका. यामुळे केस वाढण्यास मदत होईल.
(वाचा :- धकधक् गर्ल Madhuri Dixit च्या सौंदर्याचे भारत ते अमेरिका सारेच दिवाने, घायाळ करणा-या सौंदर्यामागील टॉप सीक्रेट उघड..!)
मेथीचा वापर
लांब केसांसाठी तुम्ही मेथीचा (fenugreek) पण वापर करू शकता. या उपायासाठी काही चमचे मेथीचे दाणे घ्या आणि गरम पाण्यात मिसळा आणि थोडे थंड झाल्यावर केसांमध्ये लावा व काही वेळाने केस धुऊन घ्या. यामुळे केस वाढण्यास मदत होईल.
(वाचा :- पावसाळ्यात अशा प्रकारे सांभाळा तुमचे फ्रिझी हेअर, जाणून घ्या तज्ञांचे मत)
कोरफडीचा वापर
केसांमध्ये आपण कोरफडीचा (aloe vera) वापर करू शकता. या उपायामुळे केस चमकदार होतात त्याच प्रमाणे केसांची गळती देखील थांबण्यास मदत मिळते.
(वाचा :- चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याच्या प्रयत्नात आहात ? मग तज्ज्ञांनी सांगितले हे ५ उपाय)
आवळा
आवळा खाल्ल्यामुळे केस वाढण्यास मदत होत. यासाठी तुम्ही आवळा पावडर किंवा आवळा ज्यूसचा वापर करु शकता. व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा केसांच्या वाढीसाठी खूप पोषक असल्याचे सांगितले जाते. हा उपाय तुम्ही महिन्यातून किमान 1 ते 2 करु शकता.
(वाचा :- काचेसारख्या चमकदार त्वचेसाठी डॉक्टरांनी सांगितलेले हे साधे सोपे उपाय करु पाहा)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या