तुमचे आधारकार्ड किती वेळा झाले आहे अपडेट? ‘या’ सोप्या पायऱ्यांचा वापर करून जाणून घ्या

तुमचे आधारकार्ड किती वेळा झाले आहे अपडेट? ‘या’ सोप्या पायऱ्यांचा वापर करून जाणून घ्या

तुमचे आधारकार्ड किती वेळा झाले आहे अपडेट? ‘या’ सोप्या पायऱ्यांचा वापर करून जाणून घ्या


भारतात आधारकार्डचा वापर एक आवश्यक ओळखपत्राच्या रूपात केला जाऊ लागला आहे. तथापि, याचा वापर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील केला जातो. तसेच बँकेत खाते उघडल्यानंतर पत्त्याच्या पुराव्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी एक आवश्यक दस्ताऐवज बनले आहे. म्हणूनच आधारासाठी दिली गेलेली महत्त्वपूर्ण माहिती योग्य असणे आवश्यक आहे. तसेच, अपडेट आल्यास तुम्ही युआयडीएआय वेबसाइटवर जाऊन ते सहजपणे अपडेट करू शकता.

आधारकार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआयतर्फे अनेक ऑनलाइन सुविधा दिल्या जातात. जेणेकरून तुम्ही घरबसल्या आधारकार्डमध्ये आवश्यक बदल करू शकता. ऑनलाइन सुविधांमध्ये, तुम्ही नाव, जन्मतारीख, पत्ता आणि मोबाइल नंबर यासारखी वैशिष्ट्ये बदलू शकता. तसेच अनेक सुविधा ऑफलाइन दिल्या जातात. तुम्ही सीएससी केंद्राला भेट देऊन त्यात सुधारणा करू शकता. सीएससी केंद्राची स्थापना युआयडीएआयद्वारे करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने ऑफलाइन पद्धतीने तुम्ही बायोमेट्रिक तपशील आणि इतर माहिती अपडेट करू शकता.

तुम्हाला तुमचे आधारकार्ड किती वेळा अपडेट केले गेले आहेत हे तपासायचे असेल, तर तुम्ही सोप्या पायऱ्यांच्या मदतीने या प्रक्रियेबद्दल माहिती मिळवू शकता. अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार कार्ड तपासता येईल.

हेही वाचा :  आधार कार्डवरचं नाव/पत्ता बदलायचा आहे? घरबसल्या करु शकता, फक्त या १० स्टेप्स कराव्या लागतील फॉलो

आपले आधार कार्ड किती वेळा अपडेट झाले आहे हे कसे जाणून घ्यावे ?

  • सर्वात आधी आधारकार्डसाठीच्या अधिकृत वेबसाइट resident.uidai.gov.in वर जावे.
  • त्यानंतर आधारकार्डच्या ‘My Aadhar’ सेक्शनमध्ये जावे.
  • इथे उपलब्ध असलेल्या आधारकार्ड संबंधी पर्यायावर क्लिक करावे.
  • आता आधारकार्ड अपडेट हिस्ट्रीवर क्लिक करावे.
  • तुमच्यासमोर एक नवे पेज उघडेल.
  • या पेजवर आधारकार्ड नंबर किंवा व्हर्च्युअल आयडी टाका.
  • यानंतर कॅप्चा कोड सबमिट करा. तुमच्या रजिस्टर फोन नंबरवर ओटीपी येईल.
  • ओटीपी दिल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • नवीन पेज उघडून आधारकार्डची अपडेट झालेली संपूर्ण हिस्ट्री तुमच्यासमोर येईल.

The post तुमचे आधारकार्ड किती वेळा झाले आहे अपडेट? ‘या’ सोप्या पायऱ्यांचा वापर करून जाणून घ्या appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …