वाचा-भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं कुठे बुक करता येतील, जाणून घ्या लिंक आणि किंमत..
रोहित सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे आशिया चषकात रोहित धावांचा डोंगर उभारू शकतो, असे म्हटले जात आहे. आतापर्यंतच्या आशिया चषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने आतापर्यंत आशिया चषक स्पर्धांमध्ये २३ सामन्यांमध्ये ५१.१० च्या सरासरीनं ९७१ धावा केल्या आहेत. रोहित हा विक्रम मोडण्याचा फारच जवळ पोहोचला आहे. सचिनचा विक्रम मोडीत काढण्यासाठी रोहितला आता फक्त ८९ धावांची गरज आहे. रोहित शर्माने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंतच्या २७ सामन्यांमध्ये ४२.४० च्या सरासरीनं ८८३ धावा आहेत. त्यामुळे या स्पर्धेत ८८ धावा जर रोहितने केल्या तर त्याची आणि सचिनची बरोबरी होऊ शकते. त्याचबरोबर रोहितने ८९ धावा केल्या तर आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतो. रोहितने यावेळी कोहली आणि धोनी यांनाही पिछाडीवर सोडले आहे.
कोहलीने आतापर्यंतच्या आशिया चषक स्पर्धेत ७६६ धावा केल्या आहेत, तर धोनीच्या नावावर ६९० धावा आहेत. कोहली सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात नाही. गेल्या जवळपास तीन वर्षांमध्ये कोहलीला एक शतकही झळकावता आलेले नाही. त्यामुळे कोहली या स्पर्धेत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढेल, असे बऱ्याच जणांना वाटत नाही. पण रोहित फक्त एका सामन्यात सचिनचा विक्रम मोडीत काढू शकतो. कारण जर रोहितने या स्पर्धेत फक्त एक शतक जरी झळकावले तर त्याला सचिनचा विक्रम मोडता येऊ शकतो. त्यामुळे या आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत असताना रोहित किती धावा करतो, याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या