कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत सध्या रंजक वळण सुरु आहे. मालिकेत काही वर्षांचा गॅप दाखवण्यात आला आहे. मालिकेत एक नवीन ट्रॅक सुरु झाला आहे. यामध्ये अभ्या मालिकेतून गायब दिसत आहे. अभ्याचा शोध सुरू आहे. अभ्याला शोधण्यासाठी मालिकेत इन्स्पेक्टर जामखेड अर्थातच अभिनेता संग्राम समेळची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेत अभ्या आणि लतीची लेक अदिरासुद्धा दाखवण्यात आली आहे. अदिरा शाळेमध्ये जाते.
हे वाचा: Raju Srivastava Death: राजू श्रीवास्तव यांचं शेवटचं स्वप्न अपूर्णच; करायचं होतं ‘हे’ काम
लती आणि अदिराच्या शाळेतील शूटिंगदरम्यान अक्षया नाईकची आपल्या चिमुकल्या चाहत्यांशी भेट घडून आली. अक्षया नाईक या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या गोड आणि गोंडस अक्षयाचे काही चिमुकले चाहतेसुद्धा आहेत. नुकतंच सेटवर त्यांची आणि अक्षयाची भेट घडून आली. अक्षयाने या मुलांसोबत खास वेळ घालवला. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये फोटोही शेअर केला आहे.
अक्षया नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो, रील्स आणि डान्स व्हिडीओ शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. अक्षया नाईक नेहमीच उत्साही दिसून येते. सेटवरसुद्धा आपल्या सह कलाकारांशी तिचं फार छान जमतं.सह कलाकारांसोबत अक्षयाचं सुंदर बॉन्डिंग आहे. अक्षया नाईकने मराठीत काम करण्यापूर्वी ‘ए रिश्ता क्या केहेलाता है’ या प्रसिद्ध मालिकेत काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या