‘सुंदरा मनामध्ये भरली’मधली चिमुरडी लतिका देणार परीला टक्कर, सोशल मीडियावर आहे लोकप्रिय

मुंबई :सुंदरा मनामध्ये भरली मालिकेचा महाएपिसोड गेल्या रविवारी झाला. खरं तर प्रेक्षकांना लतिक आणि अभिमन्यूची प्रेमकहाणी पाहायला आवडायची. पण मालिकेत अभिमन्यू जगातूनच गेलाय. तर लतिकाची छोटी मुलगी तिची जणू कार्न काॅपीच आहे. या छोट्या लतिकानंच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

त्या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या…नेमका कोणावर आणि का भडकलाय शशांक?

ही चिमुरडी आहे आदिरा औंधकर. सोशल मीडियावर ती स्टार आहे. तिचे वडील तिचं इन्स्टा अकाऊंट हँडल करतात. ४४ हजाराहून जास्त तिचे फाॅलोअर्स आहेत. आदिरा नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे आता मालिकेत काम करताना ती कॅमेऱ्यासमोर अजिबातच बिचकत नाही. उलट बिनधास्त अभिनय करते.

सेटवरही आदिरा छान रमली आहे. लतिकाची भूमिका करणारी अक्षया नाईक आणि तिची चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात सोशल मीडियावरची स्टार छोट्या पडद्यावरही आपला चाहता वर्ग तयार करणार तर!

अनिरुद्धनं लावलाय ओम नम: शिवायचा जप, हा Video पाहिलात की कळेल!

आता लतिका आणि आदिरा मालिकेत फोकस असले तरी अभिमन्यूची कमतरता प्रेक्षकांना जाणवतेय. त्याला कशाला गायब केलं, असं प्रेक्षक विचारत आहे. अभिमन्यूची भूमिका करणारा समीर परांजपे बिग बाॅसच्या घरात जाणार म्हणून मालिकेच कथानकच बदललं, अशीही चर्चा जोरात आहे.

समीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर , ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर ‘गोठ’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि ‘अग्निहोत्र २’ या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली. ‘भातुकली’ या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या ‘क्लास ऑफ ८३’मधून दिसलेला समीर आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत एका वेगळ्या नायकाच्या भूमिकेत दिसला होता.

पालक वेगळे असले की मुलं वेगळी होतात सांगणारी बयोची आई भारती

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next ICCने गेमच बदलला; वर्ल्डकपच्या आधी क्रिकेटच्या नियमात केले मोठे बदल

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …