लतीचा अभिमन्यू मालिकेतून गायब, ‘बिग बाॅस’मध्ये दिसण्याची शक्यता?

मुंबई : सध्या सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका १० वर्षांनी पुढे जाणार आहे. तसे प्रोमो व्हायरल झाले आहेत. पण या १० वर्षांच्या लीपमध्ये लतिकाचा अभिमन्यू कुठे दिसत नाहीय. उलट तिची मुलगी तिला विचारतेय, की बाप्पा पप्पांना खाली पाठवणार का? म्हणजे अभिमन्यू गायब आहेच.

आता चर्चा अशीही आहे की अभिमन्यूची भूमिका करणारा समीर परांजपे मालिकेतून मुद्दाम गायब आहे. कारण तो आता कलर्स मराठीवरच्याच बिग बाॅसच्या चौथ्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे. बिग बाॅसच्या घरात कोण असणार याची उत्सुकता जरी शिगेला पोहोचली असली, तरीही कलाकारांची नावं काही अजून समोर आलेली नाहीत.

धनश्री-युझीमध्ये सारंकाही आलबेल! कपलचा रोमँटिक किस Video व्हायरल

सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स मराठीवरचीच मालिका. त्यामुळे एकाच घरातला शो असल्यानं मालिकेत तशी अॅडजेस्टमेंट करण्याची शक्यता जास्तच आहे. तसंही प्रोमोमध्ये लतिकाच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाहीय. त्यामुळे पुढच्या नव्या भागात अभिमन्यू मालिकेत नसणार.

मालिकेत अभिमन्यू म्हणून घराघरात पोहोचलेला समीर सोशल मीडियावर सक्रिय आहे. आपले कामाचे, वैयक्तिक फोटोज व्हिडिओ तो शेअर करत असतो. आषाढी एकादशीला त्यानं गायलेलं विठ्ठलाचं गाणं चाहत्यांना आवडलं होतं. व्हिडिओत तो ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे गाणं गाताना दिसला. साडेतीन मिनिटांच्या या व्हिडिओ समीर अतिशय भक्तिभावानं विठुरायाचं हे गाणं गाताना आपल्याला दिसला.

समीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर , ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर ‘गोठ’, ‘गर्जा महाराष्ट्र’ आणि ‘अग्निहोत्र २’ या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली.

देव जे जे दाखवेल ते बघायला तयार आहे, असं का म्हणतेय प्राजक्ता माळी?

‘भातुकली’ या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. नेटफ्लिक्सच्या ‘क्लास ऑफ ८३’मधून दिसलेला समीर आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत एका वेगळ्या नायकाच्या भूमिकेत दिसला.

बोल्ड, बिंधास्त सई ताम्हणकर एयरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

एकाच दिवशी एकाच मंचावर मराठीतील 7 सिनेमांची घोषणा; पाहा डिटेल्स

मुंबई,  15 सप्टेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर सिनेसृष्टी पुन्हा जोमानं सुरू झाली आहे. …

धनश्री-युझीमध्ये सारंकाही आलबेल! कपलचा रोमँटिक किस Video व्हायरल

मुंबई: युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली डान्सर आणि कोरिओग्राफार धनश्री वर्मा (Dhanashree Verma Instagram) आणि भारतीय …