एकाच दिवशी एकाच मंचावर मराठीतील 7 सिनेमांची घोषणा; पाहा डिटेल्स

मुंबई,  15 सप्टेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर सिनेसृष्टी पुन्हा जोमानं सुरू झाली आहे. मराठी सिनेसृष्टीत अनेक नवे प्रयोग होऊ लागले आहेत. अनेक सिनेमे मागच्या एक वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. मराठीतील दिग्गज कलाकार, निर्माते एकत्र येऊन त्यांच्या नव्या सिनेमांची घोषणा करत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच एकाच मंचावर तब्बल 7 मराठी नव्या कोऱ्या सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच मुंबईमध्ये ग्रँड इव्हेंट पार पडला. येत्या काळात मराठी रसिक प्रेक्षकांना एकाहून एक दमदार सिनेमे आणि तगडे कलाकार मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. कोणते आहेत ते सिनेमे त्यांचे डिटेल्स जाणून घ्या.

निरवधी

अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘दे धक्का 2’ हा सिनेमा या वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता 2023मध्ये ‘निरवधी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं पोस्टर समोर आलं होतं. महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित आणि सुबोध भावे, गौरी इंगवले आणि उपेंद्र लिमये ही स्टार कास्ट सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सुटका

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकच्या आणखी एका सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात नाव आहे ‘सुटका’. अभिनेता स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत.

ती मी नव्हेंच

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मराठी सिनेमात काम करणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि उर्मिला मातोंडकर यांच्या ‘ती मी नव्हेंच’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

एकदा येऊन तर बघ

हायस्यजत्रेची टीम मोठ्या पडद्यावर कल्ला करणार आहे. अभिनेत्री विनोदवीर प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघ’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमात अभिनेत्री तेजस्विनी पंडित, पंढरीनाथ कांबळे, नम्रता आवटे,  वनिता खरात हे कलाकार दिसणार आहेत.

थ्री चिअर्स

मराठी प्रेक्षकांना मराठी सिनेमात पुन्हा एकदा अभिनेता जॉनी लिव्हर यांची कॉमेडी पाहायला मिळणार आहे. जॉनी लिव्हर यांच्या ‘थ्री चिअर्स’ या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमा सिद्धार्थ जाधवही दिसणार आहे.

फक्त महिलांसाठी  

मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते यांच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे ज्याचं नाव आहे ‘फक्त महिलांसाठी’. या सिनेमात विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे ही रिअल लाईफ जोडी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहे.  युकेमध्ये या सिनेमाचं शुटींग होणार आहे.

एप्रिल फुल

‘टाइमपास 3’ च्या भरगोस यशांतर अभिनेता लेखक, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव नवा सिनेमा घेऊन सज्ज झाला आहे. प्रियदर्शनच्या ‘एप्रिल फुल’ या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.  अभिनेता सिद्धार्थ जाधव या सिनेमात दिसणार आहे. हसता हसता घाबरवणारा हा हलका फुलका सिनेमा असणार आहे.  थ्रीलर कॉमेडी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

विकी कौशलच्या वडिलांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त

मुंबई, 15  सप्टेंबर-   नॉर्वेमधील ओस्लो येथे आयोजित 20 व्या बॉलिवूड महोत्सवात अभिनेता-दिग्दर्शक राहुल मित्रा, …

दोन वेण्यांचा मेकओव्हर; रमाचा नवा लुक पाहून अक्षय होणार घायाळ

मुंबई,  15 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील मुरांबा ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  रमा आणि …