दोन वेण्यांचा मेकओव्हर; रमाचा नवा लुक पाहून अक्षय होणार घायाळ

मुंबई,  15 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील मुरांबा ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  रमा आणि अक्षय यांची प्यार वाली लव्ह स्टोरी प्रेक्षकांनीही एजॉय केली. दोघांची कमाल केमिस्ट्री दिवसेंदिवस बहरत असताना मालिकेचं कथानकही आणखी एंटरेस्ट्रिंग होत चाललं आहे. दोन वेण्यावाली रमा आणि हँडसम हंक अक्षयची टॉम अँड जेरीची भांडणं सर्वांना आवडली. रमाचा साधा अवतार अक्षयला देखील आवडतो. तो तिला दोन वेण्या नावानं चिडवत असतो. पण त्याच दोन वेण्यांच्या प्रेमात अक्षय कधी पडला हे त्याचंच त्याला कळलं नाही. रमाच्या दोन वेण्या या तिच्या पात्राची एक वेगळी ओळख आहे. पण याच दोन वेण्यांचा आता मेकओव्हर होणार आहे.

मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण रमाचा लुक पुर्णपणे बदलणार आहे. साधी साड्यांमध्ये दोन वेण्या घालून वावरणारी रमा आता थोडी मॉर्डन होणार आहे. रमा साडीत नाही तर डिझाइनर ड्रेसमध्ये दिसणार आहे. तिच्या दोन वेण्यांची हटके स्टाईल होणार आहे. रमाचा हा नवा अवतार पाहून अक्षय मात्र रमाच्या प्रेमात घायाळ होणार आहे. दोघांच्या प्रेमाचा मुरांबा आणखी गोड होणार आहे.

हेही वाचा – Nava Gadi Nava Rajya : ‘भूत सुहासिनीचा ओवसा?’; प्रेक्षक संतापले, नव्या मालिका सुरू करुनही झी मराठी ट्रोल
मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात रमाचा बदललेला लुक पाहायला मिळत आहे.  प्रोमोमध्ये दाखवल्या प्रमाणे, जान्हवी रमाचा मेकओव्हर करते आणि संपूर्ण कुटुंबासमोर रमाला आणते. रमाचा ब्लॅक ड्रेस, मोकळ्या केसात सर्वांसमोर येतो. रमाचा बदललेला लुक पाहून अक्षयची नजर काही रमावरुन हलत नाही.  दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात.  दोघेच नाही घरातील सगळेच रमाचा बदललेला लुक पाहून अवाक होतात.

मालिकेच्या सध्याच्या भागात आपण पाहत आहोत की, रमाला रात्री अचानक कोणाचा तरी फोन येतो आणि ती अक्षयला न सांगता घरातून निघून जाते. तिच्यावर कोणतं तरी संकट आलेलं असतं. पण अक्षयला त्रास नको म्हणून ती एकटीच निघून जाते. सकाळी अक्षय उठतो तेव्हा शेजारी रमा दिसत नाही. दोन वेण्या कुठे गेली म्हणून अक्षय ही चिंतेत दिसतो. रमावर आलेल्या नव्या संकटाला ती कशी सामोरी जाणार हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत येणार मोठा लीप; अभ्याची मालिकेतून एक्झिट?

मुंबई, 15 सप्टेंबर : कलर्स मराठीवरील  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक …

म्हणून प्रियांकाने दिला शशांक केतकरशी लग्नाला होकार! मान्य केली प्रत्येक मुलीला आवडेल अशी अट

मुंबई: अभिनेता शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे (Shashank Ketkar and Priyanka Dhavale) या कपलने २०१७ …