T20 World Cup मधून बाहेर, रविंद्र जडेजानं चाहत्यांशी शेअर केली मनातली गोष्ट

मुंबई : आशिया कपमधून गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा बाहेर पडला. त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्याला पूर्ण आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे तो सहाजिकच टी २० वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे.

टी २० वर्ल्ड कप खेळण्याची संधी हुकल्यानंतर रविंद्र जडेजानं एका पोस्ट शेअर केली आहे. टी २० वर्ल्ड कपसाठी खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र दुखापतीमुळे आता ते पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे जडेजानं पोस्ट शेअर करून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

जडेजानं आपल्या इन्स्टावर फोटो पोस्ट करून एकावेळी एक पाऊल असं कॅप्शन देऊन पोस्ट शेअर केली. त्यानंतर अनेकांनी त्याला लवकर बरा हो अशा शुभेच्छा दिल्या आणि प्रार्थनाही केली आहे. क्रिकेटप्रेमी देखील जडेजाला खूप मिस करत आहेत.

सुरेश रैनानं त्याला लवकर बरा हो! अशी कमेंट केली आहे. जडेजाच्या गुडघ्याला आशिया कपमध्ये दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे पुढचे दोन सामने तो खेळू शकला नाही. आता टी २० वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. मैदानात कधी परतणार याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती जडेजानं दिली नाही.

सर्जरीनंतरही जडेजानं फोटो शेअर केला आणि यामध्ये कर्मचारी, BCCI, सपोर्टीव्ह स्टाफचे आभार मानले होते. टी २० वर्ल्ड कपमध्ये जडेजाच्या जागी निवड समितीनं अक्षर पटेलला संधी दिली आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. आशिया कपमध्ये देखील त्याला जडेजाच्या जागी खेळवण्यात आलं होतं.

Published by:Kranti Kanetkar

First published:

Tags: Ravindra jadeja, Rohit sharma, T20 world cup 2022, Team india

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next WhatsApp यूजर्सना मोठा धक्का, ‘या’ Smartphone मध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद

Check Also

धक्कादायक! पाकिस्तानी क्रिकेटरचं चाहत्यासोबत गैरवर्तन पाहा VIDEO

मुंबई : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटरने गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूवर त्याने …

T20 World Cup नंतर विराट कोहली घेणार संन्यास?

मुंबई : क्रिकेटमधील (Cricket) किंग म्हटलं की विराट कोहली (Virat Kohli) हेच नाव डोळ्यासमोर येतं. …