5 खेळाडूंनी वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, कसा जिंकणार T20 वर्ल्ड कप?

मुंबई : आशिया कपमधून टीम इंडिया बाहेर पडली आहे. टीम इंडियाचं आशिया कप मिळवण्याचं स्वप्न अधूरं राहिलं आहे. आता चर्चा आहे ती टी २० वर्ल्ड कपची. टी २० वर्ल्ड कप तोंडावर आला आहे. याच दरम्यान टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे सध्या बाहेर आहेत. त्यामुळे टी २० वर्ल्ड कप कसा जिंकायचा हा प्रश्न रोहित शर्मासमोर आहे. टीममध्ये सतत बदल करूनही अपेक्षित निकाल मिळत नाही.

दिग्गज खेळाडूंचा फिटनेसचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी महत्त्वाचा बॉलर आहे. सध्या त्याला पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे तो खेळू शकत नाही. आशिया कपसाठी त्याला आराम देण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया सीरिजमधूनही बाहेर होण्याची शक्यता आहे. टी २० वर्ल्ड कपपर्यंत तो फिट व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

हर्षल पटेलला देखील दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर जावं लागलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिजमध्ये तो मैदानात खेळण्यासाठी उतरेल अशी अपेक्षा आहे. तसं झालं तर त्याचा टी २० वर्ल्ड कपआधी सराव होईल. तो स्लो बॉल आणि यॉर्कर फेकण्यात माहिर आहे. त्यामुळे टीमसाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे.

ऑलराऊंडर जडेजानं आशिया कपमधील दोन सामन्यात उत्तम कामगिरी केली होती. पण दुखापतीमुळे तो तिसरा सामना खेळू शकला नाही. त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आशिया कप पाठोपाठ जडेजा टी २० वर्ल्ड कपमधूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे.

आवेश खानला सध्या ताप आहे. त्याचं वाढणारं आजारपण टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं आहे. तो लवकर बरा होणं टीमसाठी खूप गरजेचं आहे. अजून महिनाभर अवकाश असला तरी टीम इंडियाला पर्याय शोधणंही कठीण झालं आहे. यावेळी टी २० वर्ल्ड कप हातून जावू नये म्हणून रोहितने कंबर कसली आहे.

Published by:Kranti Kanetkar

First published:

Tags: Jasprit bumrah, T20 world cup 2022, Team india

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

मोहाली, 20 सप्टेंबर: हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं मोहाली टी20त भारतीय बॉलर्ससाठी बऱ्याच …

रोहित शर्मा करतोय एकच मोठी चूक… तीन सामने, तीन पराभव अन् फक्त एकच गोष्ट ठरतेय मारक

मोहाली : भारतीय संघाला ट्वेन्टी-२० सामन्यात सलग तीन पराभव आता पत्करावे लागले. पण या तिन्ही …