T20 World Cup साठी पठाणने सांगितली भारताची Playing XI, कॅप्टनलाच केलं बाहेर!

मुंबई, 20 जून : 2022 सालचा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपआधी टीम इंडिया (Team India) 4 सीरिज खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध 2 टी-20, इंग्लंडविरुद्ध 3, वेस्ट इंडिजविरुद्ध 5 आणि आशिया कपमध्ये टीम इंडियाचे खेळाडू मैदानात उतरतील. या 4 सीरिजमधूनच टीम इंडियाची वर्ल्ड कपसाठीची 15 जणांची टीम निवडली जाईल. पण भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने (Irfan Pathan) टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताची प्लेयिंग इलेव्हनच निवडून टाकली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतलाच (Rishabh Pant) पठाणने बाहेर केलं आहे, त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) त्याने संधी दिली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पठाणने विराट कोहलीलाच (Virat Kohli) पसंती दिली आहे. विराट सध्या फॉर्ममध्ये नसला तरी त्याचं ऑस्ट्रेलियातलं रेकॉर्ड उल्लेखनीय आहे, त्यामुळे त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये ठेवणं गरजेचं आहे, असं पठाण म्हणाला. तो स्टार स्पोर्ट्ससोबत बोलत होता. रोहित आणि केएल राहुल ओपनिंग करतील, असंही पठाणने सांगितलं.
वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरऐवजी सूर्यकुमार यादव खेळेल, तर ऑलराऊंडर हार्दिक पांड्या असेल. विकेट कीपर म्हणून दिनेश कार्तिक मैदानात उतरेल. यानंतर रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर बॉलिंगची जबाबदारी असेल, अशी प्रतिक्रिया इरफान पठाणने दिली.
इरफान पठाणची वर्ल्ड कपची प्लेयिंग इलेव्हन
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

Published by:Shreyas

First published:

Tags: T20 world cup, Team india

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने पूर्ण केली ‘सिटाडेल’ची शूटिंग
Next IND vs ENG : टेस्टसाठी रोहितचा पार्टनर ठरला! BCCI ने शेअर केला ओपनरचा VIDEO

Check Also

ठरलं… टीम इंडियासोबत वर्ल्ड कपसाठी ‘हे’ खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाणार!

मुंबई, 17 सप्टेंबर: 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी जवळपास …

ऑस्ट्रेलिया सीरीजआधी विराटचा नवा अवतार… किंग कोहलीची नवी हेअर स्टाईल पाहिलात?

मुंबई, 17 सप्टेंबर: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानात जितका लोकप्रिय आहे तितकीच मैदानाबाहेरही त्याची …