विकी कौशलच्या वडिलांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त

मुंबई, 15  सप्टेंबर-   नॉर्वेमधील ओस्लो येथे आयोजित 20 व्या बॉलिवूड महोत्सवात अभिनेता-दिग्दर्शक राहुल मित्रा, ऍक्शन दिग्दर्शक शाम कौशल आणि प्रसिद्ध लेखक, अभिनेता-दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांना सन्मानित करण्यात आलं आहे.लॉरेन्सकोग कुलटुरहस सेंटर,येथे आयोजित एका शानदार पुरस्कार कार्यक्रमात, लॉरेन्सकॉगचे महापौर रॅगनहिल्ड बर्गहाइम यांनी शाम कौशल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं. तर सौरभ शुक्ला आणि राहुल मित्रा यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबाबत सन्मानित करण्यात आलं आहे.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विकी कौशलचे वडील आणि ऍक्शन दिग्दर्शक शाम कौशल यांनी चित्रपटसृष्टीतील आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत ज्यांच्यासोबत काम केलं त्या सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी सर्वांना स्वप्न पाहत राहण्याचा सल्ला दिला. तसेच स्वप्न पाहणं कधीही थांबवू नका असं आवाहनही केलं आहे.

फारच कमी लोकांना माहिती असेल, शाम कौशल हे बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचे वडील आहेत. ते बॉलिवूडमध्ये त्यांच्या ऍक्शन दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. नाना पाटेकर यांनी शाम कौशल यांना त्यांच्या ‘प्रहार’ या चित्रपटात पहिल्यांदा संधी दिल्याचं बोललं जातं. परंतु ऍक्शन दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘इंद्रजलम’ हा मल्याळम चित्रपट होता. अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अमरीश पुरी, गोविंदा, ऋषी कपूर, अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांनी ऍक्शन दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
(हे वाचा:Brahmastra: ‘एका अशा दिग्दर्शकाने सिनेमा बनवला जो फक्त…., ब्रह्मास्त्रबाबत एरिका फर्नांडिसचं मोठं विधान )
शाम कौशल यांचा मुलगा विक्की कौशल सध्या बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने अनेक दमदार भूमिका साकारत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. शिवाय कतरिना कैफसारखी प्रतिभावान अभिनेत्री त्यांची सून आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या धाकटा मुलगा सनी कौशलसुद्धा एक अभिनेता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

दोन वेण्यांचा मेकओव्हर; रमाचा नवा लुक पाहून अक्षय होणार घायाळ

मुंबई,  15 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील मुरांबा ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  रमा आणि …

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत येणार मोठा लीप; अभ्याची मालिकेतून एक्झिट?

मुंबई, 15 सप्टेंबर : कलर्स मराठीवरील  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक …