कतरिना-विकी झळकणार एकत्र! पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार सेलिब्रेटी कपल

मुंबई, 14 सप्टेंबर-  बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक, विकी कौशल आणि कतरिना कैफ होय. जोडप्याने डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोघांना अनेकदा कार्यक्रमांत एकत्र पाहण्यात आलं आहे. परंतु आता या जोडप्याचे चाहते त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्याची वाट पाहात आहेत. कतरिना-विकीचे चाहते या दोघांना एकत्र चित्रपटात किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा आता काही प्रमाणात संपली आहे. दोघे लवकरच एकत्र दिसणार आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशल पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. परंतु दोघे कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर एका जाहिरातीच्या शूटसाठी एकत्र आले आहेत. कतरिना आणि विकी एका ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीत दिसणार आहेत आणि त्याचा पहिला लुक आता समोर आला आहे.सोबतच कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच एखाद्या चित्रपटातसुद्धा दिसतील अशा अपेक्षा चाहत्यां कडून व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये कतरिना आणि विकी वेगवेगळे कपडे घालून कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहेत. काही फोटोंमध्ये ते हॉलिडे वेअर तर काही कॅज्युअल वेअरमध्ये प्रमोट करताना दिसत आहे. या जोडप्याच्या चाहत्यांना हा फोटो प्रचंड पसंत पडला आहे. एका फोटोमध्ये विकी कतरिनाचं कौतुक करताना दिसत आहे. तर कतरिना लाजताना दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.


(हे वाचा:Priyanka Chopra: प्रियांका चोप्राचं विदेशातील घर पाहिलंत का? अभिनेत्रीने दाखवली झलक )
कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुपचूप लग्न केलं होतं. राजस्थानमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नापूर्वी दोघांनी कधीही आपल्या प्रेमाचा किंवा नात्याचा खुलासा केलेला नव्हता. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच मीडियाला याबाबत अंदाज आला होता. राजस्थानला रवाना होण्यापूर्वी विकी कौशल कतरिनाच्या अपार्टमेंटच्या बाहेर दिसून आला होता. त्यानंतर एयरपोर्टवर जाताना कतरिनाची सर्व फॅमिली कॅमेऱ्यात कैद झाली होती. या दोघांनी लग्नानंतर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

प्राजक्ता माळीची इच्छा झाली पूर्ण, सोशल मीडियावर Photo शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात …

अखेर शालिनीच्या पापांचा घडा भरणार; जयदीप गौरी देणार ‘ही’ शिक्षा

मुंबई, 14 सप्टेंबर : स्टार प्रवाह वरील ‘सुख म्हणजे काय असतं’ मालिकेत सध्या सगळं वातावरण …