प्राजक्ता लंडनला सिनेमाच्या शूटिंगला गेली आहे. तिच्या सोबत संकर्षण, वैभव तत्त्ववादी, हृषिकेश जोशी हे कलाकार आहेत. तिनं लिहिलं आहे, ‘जवळपास अर्धी मराठी इंडस्ट्री लंडनला येऊन फिल्म शूट करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचाच होता. सरतेशेवटी मी इथे आहे.’ आता कुठल्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे, त्याबद्दल अजून कळलं नाहीय. पण ते लवकरच कळेल. या पोस्टमध्ये तिनं महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला विसरू नका, असंही म्हटलं आहे.
अरुंधती तू रड,भांड पण… आशुतोषनं असं काय विचारलं आपल्या मैत्रिणीला?
प्राजक्तानं रानबाजार वेब सीरिजमध्ये काम केलं होतं. वाय सिनेमातही तिची भूमिका होती. तिच्या भूमिकांचं कौतुक होत आहे. गणेशोत्सवात तिनं मुंबई-पुण्याच्या गणपतींचं दर्शन घेतलं. तसंच मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरही ती गेली होती. त्यावेळी तिनं आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.
प्राजक्ता नेहमीच तिच्या नितळ त्वचेचं रहस्य सांगत असते. लॉकडाउन काळात प्राजक्ताने तिच्या इन्स्टापेजवरून चाहत्यांना ग्लो स्किनसाठी खास टिप्स दिल्या होत्या. योगप्रेमी असलेली प्राजक्ता फिट राहण्यासाठी काय आहार घेते याचीही माहिती काहीही न लपवता ती शेअर करते. त्यामुळे प्राजक्ताच्या टिप्स फॉलो करण्यासाठी तिच्या चाहत्यांच्या यादीतील तरुणी कायम तयार असतात.
शैलेश लोढा ‘तारक मेहता…’ च्या निर्मात्यांवर नाराज? म्हणाले- शेवटचं कधी खरं
कामाच्या निमित्ताने प्राजक्ताने आता मुंबईत घर घेतलं असलं तरी प्राजक्ता मूळची पुणेकर आहे. घरच्यांसोबत ती बाहेर फिरायला गेली होती, यावेळचे काही फोटो तिने शेअर केले. यावेळी संपूर्ण कुटुंबासोबत तिने लगोरीचा डाव मांडला. या खेळातील धमाल तिने व्हिडिओतून शेअर केली होती.
महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश जेनेलिया वांद्रयात जिम बाहेर स्पॉट
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या