आधी आलिशान कार आणि आता गोव्यात घर; कमी वयात तेजस्वीच्या कमाईची होतेय चर्चा

मुंबई, 21  सप्टेंबर : तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री सध्या जिकडेतिकडे गाजत आहे. जेव्हापासून या अभिनेत्रीने बिग बॉसमध्ये प्रवेश केला आहे, तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिच्या मालिका आणि करण  कुंद्राच्या रिलेशनशिपमुळे ही अभिनेत्री सगळ्यांना परिचित आहे.  तिच्याकडे सध्या बरेच प्रोजेक्ट आहेत. कठोर मेहनत घेऊन ती तिचं करियर जोरात चाललं आहे.  काही महिन्यांपूर्वीच तेजस्वीने एक आलिशान कार खरेदी केली होती. आता आणखी एक माहिती समोर येत आहे की, तिने नुकतेच गोव्यात आपले घर खरेदी केले आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये तिच्या हातात नवीन घराची चावी दिसत आहे.

तेजस्वी प्रकाश सध्या यशाच्या शिखरावर आहे. अलीकडे, सुंदर अभिनेत्रीने गोव्यात एक नवीन घर विकत घेतलं आहे.  तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राने तिचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. तो तिच्यासाठी नेहमीसारखाच आनंदी होता. 20 सप्टेंबर 2022 रोजी, करणने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याची मैत्रीण तेजस्वीसाठी एक गोड स्टोरी पोस्ट केली आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री गोव्यातील तिच्या नवीन घराच्या चाव्या दाखवत होती, जेव्हा करणने तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती.

व्हिडिओ शेअर करताना, करण कुंद्रानेही तेजस्वीसाठी एक नोट लिहिली आहे. त्याने तिला ‘मेहनती’ म्हटले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय  की, ‘अभिनंदन बेबी, तू त्याची लायक आहेस! मला तुझा खूप अभिमान आहे, तू खूप मेहनती आहेस. तुझं प्रत्येक शहरात घर असावं.’

हेही वाचा – Richa Chadha Ali Fazal Wedding: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची लग्नपत्रिका आहे फारच भन्नाट; तुम्ही एकदा पाहाच!

यापूर्वी 5 एप्रिल 2022 रोजी तेजस्वीने एक नवीन आलिशान कार खरेदी केली होती. यावेळी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राही तिच्यासोबत होता. त्याने आणखी एक यश साजरे केले होते. एका व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की तेजस्वी नारळ फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिचा प्रियकर करणने तिला मदत केली आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, आम्ही तेजस्वीला त्याच्या नवीन कारवर स्वस्तिक चिन्ह बनवताना पाहिले.

आता मराठमोळी तेजस्वी  मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज झाली आहे..  तेजस्वी प्रकाश लवकरच अभिनय बेर्डेसोबत ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. याबाबत आधीच आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती. परंतु आता या चित्रपटातील  तिचा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटासोबतच सध्या तेजस्वी प्रकाश ‘नागिन ६’ मालिकेत दिसत आहे. त्याचबरोबर ती अभिनेता आयुषमान खुरानासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात तेजस्वी आयुष्मानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Next Wiproने 300 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; ,समोर आलं कारण

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …