झहीर खान आणि जयवर्धन यांच्यावर मुंबई इंडियन्सने सोपवली नवी जबाबदारी

मुंबई : मुंबई इंडियन्सने झहीर खान आणि जयवर्धन यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मुंबई इंडियन्सने माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि श्रीलंका टीमचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आता आणखी 2 परदेशी लीगमधील संघ असल्याने झहीर खानला क्रिकेट विकासाचे ग्लोबल हेड आणि जयवर्धनेला ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

मुंबई इंडियन्सने महेला जयवर्धने आणि झहीर खान यांच्यावर नवीन भूमिका सोपवल्या आहेत. MIचा विस्तार मोठा होत असताना या दोघांवर या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. झहीर खानची एमआयच्या क्रिकेट डेव्हलपमेंटचे ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडूंच्या विकासामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

खेळाडूंचं कौशल्य ओळखणं आणि टीम मजबूत करण्यासाठी गाइडन्स देण्याचं काम ते करणार आहेत. झहीरची ही भूमिका जगभरातील MI संघांना मदत करण्यात महत्त्वाची ठरेल. MI ची मदत करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा असणार आहे. त्यांच्या या नव्या जबाबदारीसाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by:Kranti Kanetkar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

53व्या वर्षी गाजवतोय क्रिकेटचं मैदान, श्रीलंकेच्या महान खेळाडूचा ‘ग्रेट कारनामा’

कानपूर, 23 सप्टेंबर: भारतात सध्या रोड सेफ्टी वर्ल्ज सीरीज टी20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत …

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आफ्रीदीला केलं सस्पेंड, पाहा का घातली खेळण्यावर बंदी?

मुंबई, 13 सप्टेंबर: पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली आफ्रीदीवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे त्याच्या …