T20 World Cup आधी टीम इंडियाची परीक्षा, खेळणार 2 महत्त्वाचे सामने

मुंबई : आशिया कप हातून गमावला आहे. तर टी २० वर्ल्ड कपच्या स्पर्धा डोळ्यासमोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये टीम इंडियाची खरी कसोटी लागणार आहे. कारण टीममधील दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. टी २० वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला २ महत्त्वाच्या सीरिज खेळायच्या आहेत. २२ ऑक्टोबरपासून टी २० वर्ल्ड कप सुरू होत आहे.

याआधी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध सीरिज खेळायची आहे. ही सीरिज एका अर्थानं टीम इंडियाची परीक्षा घेणारी ठरू शकते. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नवख्यांना टी २० वर्ल्ड कपसाठी खेळण्याची संधीही मिळू शकते.

आयसीसीने 10 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 च्या सराव सामन्यांची घोषणा केली आहे. टीम इंडियाला दोन सराव सामने खेळायचे आहे. 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी, तर 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी भिडणार आहे. हे दोन्ही सामने गाबा इथे होणार आहेत.

टीम इंडिया अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. मात्र, या संघाला अद्याप अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळायचा आहे. टीम इंडियाला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे.

T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला अजून 7 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरिजही टीम इंडियाला खेळायची आहे.

Published by:Kranti Kanetkar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

इतिहास घडवण्यासाठी नीरज चोप्रा सज्ज, पाहा डायमंड लीगच्या मेगा फायनलचा कार्यक्रम

झुरिच-स्वित्झर्लंड, 8 सप्टेंबर: ऑलिम्पिक सुवर्णविजेता भारताचा भालाफेकपटून आणखी एका ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. स्वित्झर्लंडच्या …

आता केवळ प्रतिष्ठेची लढाई, अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडिया ‘या’ चुका टाळणार?

दुबई, 8 ऑगस्ट: आशिया चषकातल्या सलग दोन पराभवांनंतर टीम इंडियाचं आशिया चषकातलं आव्हान संपुष्टात आलं …