परीक्षेत नापास झाल्याने किंवा नापास होण्याच्या भीतीने निर्माण झालेल्या तणावामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलतात. नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (National Council of Educational Research and Training, NCERT) ने मानसिक आरोग्यावर सर्वेक्षण केले आहे. यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत. भारतातील मध्यम आणि माध्यमिक स्तरावरील 81 टक्क्यांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, परीक्षा आणि निकाल हे चिंतेचे सर्वात मोठे कारण आहे.
एनसीईआरटीच्या मनोदर्पण सेलने केलेल्या मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे सर्वाधिक कारण म्हणजे अभ्यास (५० टक्के) त्यानंतर परीक्षा आणि निकाल (३१ टक्के) हे आहे.
एकूण विद्यार्थ्यांपैकी ३६ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की ते समाजात स्वीकारले जावे यासाठी चांगला अभ्यास करतात. तर ३३ टक्के विद्यार्थी समवयस्कांच्या दबावामुळे अभ्यासाचा भार उचलतात. या दोन्ही बाबींचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
NCERT ने या सर्वेक्षणात ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ३.७९ लाख विद्यार्थ्यांना समाविष्ट केले. या सर्वेक्षणात इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १,५८,५८१ विद्यार्थी मध्यम स्तराचे होते, तर २,२१,२६१ विद्यार्थी माध्यमिक स्तराचे होते. सर्वेक्षणात खासगी आणि सरकारी दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांचे मत नोंदविण्यात आले होते.
सर्वेक्षणानुसार, ५१ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते त्यांच्या वैयक्तिक जीवनात समाधानी आहेत, तर ७३ टक्के त्यांच्या शालेय जीवनात आनंदी आहेत. ५१ टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सर्व्हेक्षणात सांगितले.
जेव्हा विद्यार्थी माध्यमिक शिक्षणातून उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी गेले तेव्हा वैयक्तिक आणि शालेय जीवनातील समाधानात घट झाली. त्याचवेळी माध्यमिक स्तरावर पोहोचल्यानंतर आयडेंटिटी क्रायसिस, नातेसंबंधांबाबत वाढलेली संवेदनशीलता, समवयस्कांचा दबाव, बोर्डाच्या परीक्षेची भीती, भविष्यातील प्रवेशाबाबतची चिंता आणि अनिश्चितता यासारखी आव्हाने विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या