टीम इंडियाचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह फिटनेस टेस्टमध्ये पास झाला. हर्षलनेही ही परीक्षा यशस्वीपणे दिली आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आता टीममध्ये खेळण्यासाठी तयार आहेत. टी २० वर्ल्ड कपसाठी टीम निवडताना हे दोन्ही खेळाडू उपलब्ध असणार आहेत.
रविंद्र जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तो काही आठवडे मैदानापासून बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो टी २० वर्ल्ड कपमधून देखील बाहेर जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयने अजून अधिकृत माहिती दिली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टी २० वर्ल्ड कपसाठी १५ आणि १६ सप्टेंबर रोजी टीम इंडियाची निवड केली जाऊ शकते. १६ ऑक्टोबरपासून टी २० वर्ल्ड कपसाठी सामने खेळवण्यात येणार आहेत. तर १३ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. यंदा १६ टीम या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या