US Open मध्ये पोलंडच्या महिलेची गगनभरारी, तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव

मुंबई: US ओपनमध्ये खेळण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार करून विजय मिळवणाऱ्या महिलेचं खूप कौतुक होत आहे. US Open मध्ये ग्रँडस्लॅम किताब मिळवला आहे. टेनिस एकेरीमध्ये तिने अंतिम सामना जिंकून हा किताब आपल्या नावावर केला आहे.

पोलंडची खेळाडू ईगा श्वाइटेक हिने वर्षातील शेवटचे ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केलं. ईगाने शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात ट्युनिशियाच्या ओन्स जाबूरचा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. तिने हा सामना 6-2 7-6 (7-5) ने जिंकला. हे तिचे या वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम तर कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

तिने याचवर्षी फ्रेंच ओपन जिंकली. हार्ड कोर्टवरील हे तिचे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे अशी तिची विजयानंतरची भावना होती. जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ईगा श्वाइटेकने या वर्षी दोन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत आणि 2016 पासून एकाच मोसमात दोन ग्रँडस्लॅम एकेरी जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. 2016 मध्ये, जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपनचे विजेतेपद जिंकलं होतं.

ईगा श्वाइटेक सुरुवातीच्या 14 गुणांपैकी 12 गुण मिळवले आणि 3-0 अशी आघाडी घेतली. जबूरने पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि 12 गुणांमध्ये सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न केला. मात्र यशापासून ती थोडक्यासाठी चुकली आणि ईगाच्या नावावर किताब झाला.

Published by:Kranti Kanetkar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

T-20 World Cup: रविंद्र जडेजाला पर्याय कोण? चिंता नाही, रोहित शर्माला हुकमी एक्का सापडला!

मुंबई: आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) मध्ये भारतीय क्रिकेट संघाला अत्यंत वाईट पराभवांना सामोरे …

पाकिस्तानसाठी गुड न्यूज, मॅचविनर खेळाडू झाला फिट; कशी असेल फायनलसाठी प्लेईंग XI?

दुबई, 10 सप्टेंबर: दुबईच्या मैदानात रविवारी आशिया चषकातला महामुकाबला रंगणार आहे तो श्रीलंका आणि पाकिस्तान …