Gold Silver Price : ऐन लग्नसराईत ग्राहकांना धक्का, पाहा सोने-चांदीचे आजचे दर

Gold Silver Price on 9 April 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात वाढ होताना दिसत आहे. सोन्याने तब्बल 60 हजारांचा टप्पा पार केला आहे तर चांदीने 77 हजारांचा टप्पा पार केला. त्यातच आता सोने चांदीच्या दरासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. आता काही दिवसांनी लग्नसराई सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने आणि चांदी (gold silver rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

आज म्हणजेच 09 एप्रिल, रविवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या (gold silver price) दरात कोणताही बदल झालेला नाही. काल म्हणजे (8 एप्रिल 2023) ज्या किमतीला सोने आणि चांदी विकली गेली. आजही त्याच किमतीत सोने-चांदीची विक्री केली जाणार आहे.

वाचा: सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी

हेही वाचा :  Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

पाहा सोन्याचे आजचे दर

bankbazaar.com नुसार आज सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 22 कॅरेट सोने जे शनिवारी 56,730 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होते. तर आज म्हणजेच रविवारी त्याच किमतीत विकले जात आहे. तर दुसरीकडे 24 कॅरेट सोने आज ही 59,570 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जाणार आहे. म्हणजेच एकूणच सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चांदीचे दर स्थिर

bankbazaar.com नुसार आज चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच शनिवारी सराफा बाजारात 80,200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.  आजही त्याच किमतीत विकले जाईल.

जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव कसे ठरतात

भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. यामध्ये विविध शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केले जातात आणि त्यानंतर किरकोळ विक्रेते मेकिंग चार्जेस लावून दागिन्यांची विक्री करतात.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.

हेही वाचा :  ग्राहकांनो चला खरेदीला! सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …