‘या’ वयानंतर पालकांनी मुलांसोबत झोपू नये, होतील 5 नुकसान

आपल्या मुलाची उत्तम प्रकारे काळजी घेणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. आई-वडील त्यांच्या कामात कितीही व्यस्त असले किंवा त्यांचा मूड खराब असला, तरी ते त्यांच्या मुलाला नेहमीच प्रेमळ वागणून देतात. भारतीय पालकांसाठी आपल्या मुलाला क्षणभर एकटे सोडणे फार कठीण आहे. मुलाला देखील त्याच्या पालकांसोबत राहण्याची सवय असते, जसे की पालकांसोबत झोपणे.

मुलांना सुरुवातीपासूनच त्याच्या पालकांसोबत झोपण्याची सवय असते आणि त्याला ते अजिबात त्रासदायक वाटत नाही आणि पालकांनाही आपल्या बाळासोबत झोपायला आवडते. पण अशी वेळ येते जेव्हा पालकांनी आपल्या मुलासोबत झोपणे बंद केले पाहिजे. तसे न केल्यास मुलावर वाईट परिणाम होऊ शकतो. आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या वयानंतर पालकांनी आपल्या मुलांसोबत झोपू नये आणि त्यामागील कारणे काय आहेत हे समजून घेणार आहोत. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​या वयानंतर मुलांना सोबत झोपवू नका (Child Sleep Alone)

-child-sleep-alone

तुम्हाला मुलांसोबत झोपायची सवय असेल तर ही खूपच चांगली सवय आहे. संस्कृतीत अशीच गोष्ट सांगण्यात आली आहे. मात्र किशोरावस्था म्हणून प्यूबर्टीनंतर पालकांनी मुलांसोबत झोपू नये. जर तुमचं मुलं वयात येत असेल तर त्याला वेगळं झोपण्याची सवय लावली पाहिजे.

(वाचा – कुणासमोरही दोन वर्षांनंतरच्या मुलांचे कपडे बदलणे टाळा, Sexual Abuse साठी कारणीभूत ‘या’ गोष्टी, सुधा मूर्ती टिप्स)

​मुलांमध्ये होतात अनेक बदल (Puberty Changes)

-puberty-changes

किशोरावस्था हे एक असं वय आहे ज्यामध्ये मुलांच्या शरीरात अनेक बदल होता. हे बदल मानसिक आणि शारीरिक परिवर्तन करणारे असतात. अशावेळी तुम्ही मुलांसोबत अजिबात झोपलं नाही पाहिजे. असं केल्यास मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. किशोरावस्थेत मुलांना एकएकटं झोपायची सवय लावली पाहिजे.

(वाचा – रविंद्र जडेजाने कुठून शोधून आणलं मुलीचं इतकं सुंदर नाव? प्रत्येकजण या नावाच्या प्रेमात)

​मुलांना वाटते लाज (Shyness In Children)

-shyness-in-children

हळूहळू मुलं मोठी होतात आणि गोष्टी समजायला लागतात. काही मुलांनाही त्यांच्या पालकांसोबत झोपायला लाज वाटते, पण ते सांगू शकत नाहीत. कारण त्यांच्या शरीरातील बदलांमुळे त्यांना इतरांसोबत झोपताना अस्वस्थ वाटते किंवा अवघडल्या सारखं वाटतं. म्हणून, वेळेत, त्याने स्वतःपासून वेगळे झोपायला सुरुवात केली पाहिजे.

(वाचा – पालक आणि मुलांमधील ‘या’ एका गोष्टीच्या अभावामुळे तुटू शकतं नातं, जाणून घ्या विभक्त न होण्याची हमी कशी मिळेल)

​​मुलांच्या प्रायव्हसीचा देखील विचार करा (Privacy)

-privacy

जर तुमचे मुलं तारुण्यात पदार्पण करताना अवस्थेत असेल, तर तुम्ही समजून घ्यायला हवं. तो मोठा झाला आहे ही गोष्ट सर्वात आधी पालकांनी स्वीकारायला हवी. मुलाला हळूहळू स्वतंत्रपणे झोपण्याची सवय लावली पाहिजे, जेणेकरून त्याला अस्वस्थ वाटण्याआधी, तुम्हाला त्याची प्रायव्हसी समजेल.

(वाचा – Queen Elizabeth II: राणीने राजकुमारी बीट्रिसचे नाव ठेवले Too Yuppie, शाही कुटुंबातील नाव ठेवण्याची पद्धत जगावेगळी))

​जास्त फोर्स करू नका (Do Not Force With Children)

-do-not-force-with-children

गरजेचं नाही की, प्रत्येक मुलं पालकांपासून वेगळं झोपून आनंदी असेल. काही मुलांना प्यूबर्टीनंतरही पालकांसोबत झोपण छान वाटतं. अशावेळी तुम्हाला मुलांना वेगळं झोपण्याची सवय लावावी लागेत. सुरूवातीला वेगळ्या बिछान्यावर झोपण्याची सवय लावा. मग हळू हळू वेगळ्या खोलीत झोपण्याची सवय लागेल.

(वाचा – Queen Elizabeth as a mother : जगासाठी महाराणी असलेल्या एलिझाबेथ यांनी कसं जपलं ‘आई’पण…)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

ब्रिटेनची महाराणी एलिझाबेथची लाडकी सून प्रिन्सेस डायनाच्या सौंदर्याचे रहस्य

ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित किस्से किंवा गोष्टी सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. …

मेनोपॉजच्या काळात त्वचेवर चुकूनही लावू नका या गोष्टी

मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचे पर्व आहे. या काळात प्रत्येक स्त्री अनेक शारीरिक …