‘तुमचं आडनाव काहीही असलं तरी…’ , नेमकं कशाबाबत बोलली क्रिती सेनन?

मुंबई, 11 सप्टेंबर- नुकतंच 67 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री क्रिती सेननला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्रीने या पुरस्कार सोहळ्याची एक झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पुरस्कार मिळाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना दिसून येत आहे. क्रिती सेननला हा पुरस्कार तिच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी मिळाला आहे, ज्यात तिने सरोगेट आईची भूमिका केली होती.या भूमिकेसाठी तिचं प्रचंड कौतुक झालं होतं.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक कबीर खान क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देताना दिसत आहे. यानंतर, अभिनेत्री स्टेजवर आपला आनंद व्यक्त करते आणि तिच्या यशाचा कानमंत्र सांगते. तरुण मुला-मुलींना संदेश देताना ती म्हणते, ‘ज्या मुलींना आणि मुलांना सांगितले जाते की हे एक मोठं स्वप्न आहे. इतकी मोठी स्वप्ने पाहू नका, ती पूर्ण होत नाहीत.मी त्यांना सांगू इच्छिते, तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवा. सतत प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्की भेटेल’.

क्रिती बोलताना पुढे म्हणाली, ‘लोक म्हणतात की इथे वशिल्याशिवाय काहीही होत नाही. पण तुम्ही कुठून आलात, तुमचे पालक कोण आहेत, तुमचं आडनाव काय आहे हे महत्त्वाचं नाही. इथेपर्यंत पोहोचण्यास थोडा जास्त वेळ लागेल. पण मनापासून प्रयत्न केल्यास त शक्य आहे. हा पुरस्कार मिळण्यासाठी मला 8 वर्षे लागली. प्रवास कठीण होता.पण शेवटी हवं ते साध्य झालं’.

(हे वाचा: VIDEO: फिल्मफेअरच्या स्टेजवरच रणवीर सिंहला कोसळलं रडू; नेमकं काय घडलं? )
अभिनेत्री क्रिती सेननने शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. शिवाय चाहते आणि सेलिब्रेटी या पोस्टवर प्रेम व्यक्त करत अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत. क्रितीच्या कामाबाबत सांगायचं तर, ती अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. यातीलच एक म्हणजे ‘आदिपुरुष’होय. यामध्ये ती साऊथ स्टार प्रभास आणि सैफ अली खानसोबत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous मेनोपॉजच्या काळात त्वचेवर चुकूनही लावू नका या गोष्टी

Check Also

‘भाभीजी घरपर है’ फेम अंगुरी भाभीसोबत घडला धक्कादायक प्रकार, समोर आली माहिती

मुंबई, 11 सप्टेंबर-   देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य लोक किंवा …

Kartik Arynan ने सांगितलं बॉलिवूड चित्रपट न चालण्याचं कारण, म्हणाला…

मुंबई, 10 सप्टेंबर :  यशाच्या उंच शिखरावर पोहचलेला अभिनेता कार्तिक आर्यनने आज CNN News18 च्या TOWN HALL …