‘भाभीजी घरपर है’ फेम अंगुरी भाभीसोबत घडला धक्कादायक प्रकार, समोर आली माहिती

मुंबई, 11 सप्टेंबर-   देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य लोक किंवा सेलिब्रेटी सर्वच लोक अशा घटनांना बळी पडत आहेत. हे लोक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्यासोबत अशा घटना घडल्या आहेत. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘भाभीजी घर पर हैं’मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रे ऑनलाइन फसवणुकीला बळी पडली आहे. याप्रकरणी तिने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

आपल्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगताना शुभांगी म्हणाली, “8 सप्टेंबरला मी एका प्रसिद्ध फॅशन अॅपवरून माझ्यासाठी काही वस्तू ऑर्डर करत होते. ऑर्डर दिल्यानंतर मला त्यांचा फोन आला. त्यांनी माझा पत्ता सांगितला आणि सांगितले की मी 3 वर्षांपासून तिथून कशी खरेदी करत आहे. त्यांनी आधीच्या सर्व ऑर्डर्सचा तपशीलही दिला त्यामुळे मला तो कॉल खरा वाटला. त्यांनी मला सांगितलं की, मी त्यांची प्रीमियम मेंबर असल्याने ते मला एक प्रोडक्ट मोफत भेट म्हणून देऊ इच्छितात.

त्यानंतर त्यांनी मला काही पर्याय दिले. त्यांनी दिलेल्या काही पर्यायांमधून मी एक उत्पादन निवडलं. पुढे त्यांनी मला फक्त जीएसटीची रक्कम भरावी लागेल असंसांगितलं. त्यामुळे जेव्हा मी जीएसटीची रक्कम भरली. तेव्हा बरेच व्यवहार झाले आणि त्यांच्याकडून माझ्या खात्यातून काही पैसे काढले गेले.
आपल्यासोबत ऑनलाइन फसवणूक झाल्याचं शुभांगीच्या लक्षात आलं. आणि तिने लगेच तिचे कार्ड ब्लॉक केले. अभिनेत्री म्हणाली की, “हे लोक फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधतात. अभिनेत्रीने सर्वांना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही दिला.
(हे वाचा:Jubin Nautiyal: जुबिन नौटियालवर संतापले लोक, होतेय अटकेची मागणी; काय आहे नेमकं प्रकरण? )
फसवणूक झाल्यास काय करावं?-
केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर क्राइम किंवा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (155260) जारी केला आहे. या क्रमांकावर तुम्ही फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता. तुम्ही अशा कोणत्याही गुन्ह्याचे बळी असाल तर सर्वप्रथम या क्रमांकावर कॉल करा. याशिवाय, तुम्ही गृह मंत्रालयाच्या https://cybercrime.gov.in/ या सायबर पोर्टलवरही याबाबत तक्रार नोंदवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

‘तुमचं आडनाव काहीही असलं तरी…’ , नेमकं कशाबाबत बोलली क्रिती सेनन?

मुंबई, 11 सप्टेंबर- नुकतंच 67 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांना सन्मानित …

Kartik Arynan ने सांगितलं बॉलिवूड चित्रपट न चालण्याचं कारण, म्हणाला…

मुंबई, 10 सप्टेंबर :  यशाच्या उंच शिखरावर पोहचलेला अभिनेता कार्तिक आर्यनने आज CNN News18 च्या TOWN HALL …