तुमचे शेजारी तुमचा Wi-Fi वापरतात का?, चेक करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली: वर्क फ्रॉम होममुळे आता इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, जवळ-जवळ प्रत्येक घरात Wi- Fi वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑफिसच्या कामांपासून ते अगदी ऑनलाईन शिक्षणापर्यंत सर्वांकरिता वायफाय आता आवश्यक झाले आहे. आपण जेव्हा आपल्या घरी वायफाय स्थापित करतो, त्यावेळी त्याचा वापर सुरक्षितपणे करणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुमच्या परवानगीशिवाय वाय-फाय इतर कोणीही वापरू शकणार नाही. याकरिता तुम्ही एक मोठा आणि कठीण WPA2 पासवर्ड सेट करु शकता. WPA2 एक एन्क्रिप्शन प्रोटोकॉल आहे आणि याचा अर्थ वाय-फाय संरक्षित प्रवेश आहे. WPA2 हे WPA, WEP इत्यादी जुन्या प्रोटोकॉलपेक्षा नवीन आणि अधिक सुरक्षित आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. जाणून घ्या या टिप्सबद्दल सविस्तर.

वाचा: Valentine’s Day बनवा खास, तुमच्या प्रिय व्यक्तींना भेट द्या हे ट्रेंडी गॅझेट्स, किंमत बजेटमध्येच

एक युजर म्हणून, तुम्हाला फक्त वाय-फाय राउटरवर WPA2 सुरक्षा सेट करणे आणि मजबूत पासवर्डसह सुरक्षित करणे आवश्यक आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पासवर्ड सेट करतांना काही मोठे आणि गुंतागुंतीचे पासवर्ड तयार करा जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण, इतर लोक त्याचा अंदाज लावू शकणार नाही.
राउटरची लॉगिन माहिती बदलणे: बहुतेक वाय-फाय राउटर दोन IP पत्त्यांसह येतात: १९२.१६८.१.१ किंवा १९२.१६८.२.१ आणि कोणत्याही ब्राउझरवरून प्रवेश केला जाऊ शकतो. बहुतेक राउटर उत्पादक लॉगिन आणि पासवर्ड म्हणून ‘रूट’ आणि ‘अॅडमिन’ सारखे शब्द वापरतात आणि एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला राउटरच्या सेटिंग्जमध्ये प्रवेश देखील सहज मिळतो . लॉगिन खूप सोपे असल्याने, पासवर्ड इतका सोपा असल्याने, कोणीही तुमच्या राउटरच्या सेटिंग्जमध्ये जाऊ शकतो.

हेही वाचा :  वडिलांची जुनी पेटी उघडली..आणि झाला कोट्याधीश..पाहून बसेल धक्का

राउटरची लॉगिन माहिती बदलणे: तुमचे वाय फी तुमच्या नकळत इतरांनी वापरू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर, राउटरचे लॉगिन तपशील ‘अॅडमिन’ व्यतिरिक्त दुसरे ठेवा. नेटवर्क सुरक्षित करण्याचा अधिक कार्यक्षम मार्ग म्हणजे राउटरचा SSID लपवणे. हे सुनिश्चित करते की ते एकमेव कनेक्ट करण्यायोग्य नेटवर्क म्हणून दर्शविले जात नाही. तुम्हाला स्वतः पत्ता प्रविष्ट करावा लागेल. इंटरनेट मॉनिटरिंग सॉफ्टवेअर वापरणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. AirSnare सारखे काही सॉफ्टवेअर आहे. जे तुम्ही वापरू शकता. ते तुमच्या नेटवर्कवर अनोळखी डिव्हाइस आढळल्यावर तुम्हाला अलर्ट करते.

वाचा: तयार राहा !१७ फेब्रुवारी रोजी धुमाकूळ घालायला येताहेत OnePlus चे दोन Smart TV, पाहा डिटेल्स

वाचा: कमी डेटा वापरणाऱ्यांपासून ते हेवी इंटरनेट युजर्सपर्यंत Jioचे ‘हे’ प्लान्स आहेत प्रत्येकासाठी परफेक्ट

वाचा: SBI अकाउंट धारकांनो लक्ष द्या ! ३१ मार्चपूर्वी हे काम न केल्यास बंद होणार बँकिंग सर्व्हिस, पाहा डिटेल्स

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन भारताने कॅनडाबरोबरच अमेरिकेलाही झापलं; जयशंकर म्हणाले, ‘ते दिवस गेले जेव्हा…’

India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रातील सदस्य देशांना दहशतवाद, कट्टरतावादी आणि …

लग्न सुरु असताना हॉलला आग! 100 जण होरपळून ठार, 150 हून अधिक जखमी; Video आला समोर

More Than 100 Killed In Fire At Wedding: इराकमधील नीनवे प्रांतातील हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी (26 …