VIDEO: कार्तिक आर्यन-सारा अली खान पुन्हा एकत्र? ‘या’ गोष्टीमुळे रंगली चर्चा

मुंबई,11  सप्टेंबर-  बॉलिवूडमधील अनेक जोड्या आणि प्रेमप्रकरणे गाजली आहेत. तर काहींचे ब्रेकअपसुद्धा चाहत्यांना धक्का देऊन गेले होते. यामध्ये अलिडकडच्या काही कलाकारांचादेखील समावेश होतो. त्यातीलच एक जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान होय. यांची जोडी प्रचंड पसंत केली जात होती.परंतु त्यांच्या ब्रेकअपने त्यांचे चाहते नाराज झाले होते. या दोघांनी कधीही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र ब्रेकअपनंतर या दोघांची काही वक्तव्ये चर्चेत आली होती.त्यानंतर हे कलाकार कधीच एकत्र दिसून आले नव्हते. मात्र अलीकडे त्यांच्यातील वाद मिटलेला दिसून येत आहे. नुकतंच सारा आणि कार्तिक एकत्र दिसून आले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या कार्तिक आर्यन त्याच्या हिट चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतो. अलीकडेच अभिनेता मुंबईत आयोजित ओटीटी प्ले अवॉर्ड्समध्ये सहभागी झाला होता. जिथे सारा अली खान आणि इतर अनेक कलाकारसुद्धा पोहोचले होते. यादरम्यान सारा आणि कार्तिक एकत्र बसलेले दिसून आलं. या इव्हेंटमधून सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र बसून गप्पा मारताना दिसत आहेत. सारा आणि कार्तिकच्या चाहत्यांना हा व्हिडिओ फारच पसंत पडत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन ब्लॅक ब्लेझर, व्हाईट शर्टमध्ये फारच हॅन्ड्सम दिसत आहे. तर सारा अली खान सोनेरी रंगाच्या चमकदार ड्रेसमध्ये फारच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. दोघे एकत्र बसून एकमेकांशी काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत. एकेकाळी एकमेकांना डेट केलेल्या कार्तिक आणि साराचं असं बॉन्डिंग पाहून त्यांचे चाहते खूप खूश आहेत.यापूर्वीही रेड कार्पेटवर सारा आणि कार्तिक समोरासमोर आले होते.

(हे वाचा:सिनेमात सिलेक्शन कसं होतं? कार्तिकने सांगितला नवी मुंबईतनं ऑडिशनला जातानाचा किस्सा )
सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने ‘लव्ह आजकल २’ मध्ये काम केलं होतं. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र पाहण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Brahmastra: ‘सुशांतसिंह राजपूतचे ब्रह्मास्त्र बॉलिवूडचा करेल विनाश…’, SSR च्या बहिणीचा संताप

Check Also

Brahmastra: ‘सुशांतसिंह राजपूतचे ब्रह्मास्त्र बॉलिवूडचा करेल विनाश…’, SSR च्या बहिणीचा संताप

मुंबई: सुशांतसिंह राजपूतने मार्च २०२० मध्ये या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याचे निधन होऊन २ वर्षांपेक्षा …

‘भाभीजी घरपर है’ फेम अंगुरी भाभीसोबत घडला धक्कादायक प्रकार, समोर आली माहिती

मुंबई, 11 सप्टेंबर-   देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य लोक किंवा …