दहानीचा कसून सराव
स्नायूच्या दुखापतीमुळे दहानी सुपर फोर फेरीआधीच जायबंदी झाला होता. पण आता दुखापतीतून सावरत दहानीनं सरावालाही सुरुवात केली आहे. फायनलआधी दहानीनं आज दुबई स्टेडियममध्ये सराव केला. गेल्या सामन्यात श्रीलंकेकडूनच पाकिस्तानला 5 विकेट्सनी हार स्वीकारावी लागली होती. त्यामुळे पाकिस्तानी संघात गोलंदाजीत काही बदल अपेक्षित आहेत.
We’re dialing up the excitement as Sri Lanka 🇱🇰 and Pakistan 🇵🇰 greet each other for the Final of the DP World #AsiaCup 2022 🏆 tomorrow!
Catch all the action LIVE exclusively on Disney+ Hotstar and Star Sports 📺#SLvPAK #ACC #AsiaCup2022 #GetReadyForEpic #AsiaCup pic.twitter.com/1SOy9zAF0R
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 10, 2022
पाकिस्तान तिसऱ्या विजेतेपदाच्या शोधात
आशिया चषकात भारतीय संघ सर्वात यशस्वी ठरलाय. भारतानं आजवर 7 वेळा आशिया चषक जिंकला आहे. पण पाकिस्ताननं मात्र केवळ दोनदाच आशिया चषकावर नाव कोरलंय. पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला त्याला आता 12 वर्ष उलटली आहे. 2010 साली पाकिस्ताननं शेवटचा आशिया कप जिंकला होता. त्यामुळे यंदा बाबर आझमची सेना विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज असेल. दुसरीकडे 2014 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकन संघ आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेनं आतापर्यंत 5 वेळा आशिया चषक जिंकला आहे. त्यामुळे विजेतेपदाचा सिक्सर मारण्याची संधी लंकन संघासमोर आहे. त्यात सुपर फोर फेरीतल्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानं दसुन शनाकाच्या या संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावलेला असेल.
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या