म्हणून प्रियांकाने दिला शशांक केतकरशी लग्नाला होकार! मान्य केली प्रत्येक मुलीला आवडेल अशी अट

मुंबई: अभिनेता शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे (Shashank Ketkar and Priyanka Dhavale) या कपलने २०१७ साली लग्न केलं. पुण्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता हे कपल पालकत्वाचा टप्पा एन्जॉय करत आहेत. व्यवसायाने वकील असलेली प्रियांका आणि अभिनेता शशांक लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. दरम्यान प्रियांकाने त्याला लग्नाला होकार कोणत्या अटीवर दिला होता, हे शशांकने स्वत:च एक व्हिडिओ शेअर करुन सांगितले होते. शशांकच्या वाढदिवशी (Happy Birthday Shashank Ketkar) जाणून घ्या हा मजेशीर किस्सा…

हे वाचा-सिनेविश्वात धमाकेदार एण्ट्रीनंतर हृता दुर्गुळेने घेतला ब्रेक! सेकंड हनीमून एन्जॉय करतेय अभिनेत्री

शशांकने फेब्रुवारी २०२२ मध्ये एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात तो ‘खरं खरं’ सांगतो आहे की प्रियांकाने त्याल लग्नाला होकार का दिला. ‘खरं खरं सांग’ या नाटकाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी त्याला ‘खरं खरं सांग’ चॅलेंज दिलं होतं. यावेळी बोलताना शशांक म्हणालेला की, ‘सुलेखा ताईने म्हणजे सुलेखा तळवलकर यांनी मला एक चॅलेंज दिलं आहे- खरं खरं सांग. ताई आपण जे दुपारे सर्वजण डबे वगैरे उघडून बसतो, त्यातील भाज्या वगैरे खरंच मी केलेलं असतं. कारण मला स्वयंपाक करायला आवडतो.’

दरम्यान प्रियांकाने घातलेल्या अटीविषयी बोलताना शशांक म्हणतो की, ‘खरतंर मी जेव्हा प्रियांकाला प्रपोज केलं होतं, तेव्हा उत्तर देताना प्रियांका म्हणाली होती की- हो मी लग्न करेन पण मी दमलेली असताना तू स्वयंपाक करशील ना? तर मला खरंच स्वयंपाक आवडतो.’ या व्हिडिओतून त्याने त्याचं स्वयंपाक प्रेम सांगितलं होतं.

दरम्यान शशांक केवळ खवय्या नसून त्याने खवय्यांसाठी एक हॉटेलही सुरू केलं आहे. ‘आईच्या गावात’ नावाचं हॉटेल शशांक चालवतो. शिवाय त्याचं युट्यूब चॅनलही आहे, ज्याद्वारे तो खाद्य पदार्थ बनवण्याचे व्हिडिओ शेअर करताना दिसतो.

हे वाचा-थोडक्यात बचावला होता विकी कौशलचा डोळा, त्या सीनमुळे घालावे लागलेले टाके

शशांक सध्या ‘मुरांबा’ (Shashank Ketkar Muramba) या मालिकेत काम करताना दिसतो आहे. यातील रमा-अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना आवडत असून अलीकडेच प्रदर्शित झालेले गणपती स्पेशल एपिसोड विशेष लोकप्रिय झाले होते.


‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘श्री’ अर्थात शशांकचा मोठा चाहतावर्ग आहे. तो सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असतो. २०१७ मध्ये त्याने प्रियांकाशी लग्न केलं होतं. हे त्याचं दुसरं लग्न असून त्याने त्याआधी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील सहकलाकार तेजश्री प्रधान हिच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर वर्षभरातच ते दोघे वेगळे झाले होते.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

विकी कौशलच्या वडिलांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त

मुंबई, 15  सप्टेंबर-   नॉर्वेमधील ओस्लो येथे आयोजित 20 व्या बॉलिवूड महोत्सवात अभिनेता-दिग्दर्शक राहुल मित्रा, …

दोन वेण्यांचा मेकओव्हर; रमाचा नवा लुक पाहून अक्षय होणार घायाळ

मुंबई,  15 सप्टेंबर : स्टार प्रवाहवरील मुरांबा ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  रमा आणि …